ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

(फोटो : डॉ.प्रविण जोशी)

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.३ सप्टेंबर,२०२६:

गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामीण लेखक, कवी, संशोधक डॉ. प्रविण जोशी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातारा जिल्ह्याच्या सहसचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी तानाजी वाघमोडे यांची कोषाध्यक्षपदी, निलेश कर्वे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी राजेंद्र निकाळजे यांची संपर्कप्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली. सातारा येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष किरण यादव आणि सरचिटणीस संतोष घोडके यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.


  डॉ. प्रविण जोशी पाडेगाव (ता. फलटण) येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत आहेत. त्यांनी आजवर जनसामन्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली असून उपेक्षित, वंचित घटकांसाठी ते काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समितीने कार्य करण्याची संधी दिल्याचे यावेळी फलटण तालुक्याचे अध्यक्ष संतोष कोळेकर यांनी सांगितले. डॉ. जोशी यांच्या ‘माणुसकीचा गाव’ या पुस्तकाची शासन ग्रंथात नुकतीच निवड करण्यात आली होती. शिक्षकांचे तसेच शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी डॉ. जोशी व सहकाऱ्यांनी सांगितले.


या निवडीबद्दल जि. प. सदस्य गिरीश बनकर, सरपंच राहुल कोकरे, उपसरपंच प्रियांका खरात, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, केंद्रप्रमुख अजयकुमार शिंदे, मनोज चव्हाण, प्रशांत खताळ, दत्तात्रय जानकर, श्रीकांत दोरगे, अजित हिंगे, संजय निगडे, दिगंबर बामणे आदींनी अभिनंदन केले. तसेच गुळुंचे, निरा, पाडेगाव, गोंदवले, वाघमोडेवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शुभेच्छासंदेश देत डॉ. जोशी व सहकार्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!