ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

क्रीडा

जाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
जाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

प्राथमिक शाळांचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते – संतोष नलावडे


(फोटो :- जाधववाडी (ता. पुरंदर ) येथे नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आलेली मिरवणूक)

 पुरंदर प्रतिनिधीदि.18:

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षण आता खाजगी शाळांच्या तुलनेत अतिशय दर्जेदार आणि प्रगत झाले आहे. अनेक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, स्मार्ट टीव्ही, आणि प्रोजेक्टर्सद्वारे आधुनिक शिक्षण दिले जाते.स्थानिक गावांचा आणि पालकांचा सहभाग वाढल्यामुळे तसेच शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक शाळांनी जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते, असे मत जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता संतोष नलावडे यांनी व्यक्त केले.
दिवे केंद्रातील जाधववाडी (ता. पुरंदर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा १५ जून पासून प्रारंभ करण्यात आला. शाळा भेट प्रसंगी श्री. नलावडे बोलत होते.

यावेळी दिवे ग्रामपंचायत सदस्या भारती आढाळगे, निलेश जाधवराव, ग्रामपंचायत अधिकारी काशीपती सुतार, निखिल आढाळगे, ज्ञानेश्वर मात्रे, अविनाश दिवेकर, आशिष दिवेकर, गणेश आढाळगे, रमेश आढाळगे, मारुती शेंडगे, विष्णू लव्हाळे, मुख्याध्यापक सुनील लोणकर, सहशिक्षिका सुरेखा लोणकर, मदतनीस अक्षदा आढाळगे आदीसह जाधववाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.


शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, गोड पदार्थांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जाधववाडी शाळेत गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या इयत्ता पहिलीतील मुलांचे कुंकवाच्या ताटात पाऊल बुडवून कागदावर ठसे उमटवून पहिले पाऊल , मुलांसाठी सेल्फी पॉईंट, मजेदार झोका हे उपक्रम राबविण्यात आले.


प्रगतशील शेतकरी कै. छबनबापू जाधवराव यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उद्योजक ऋषिकेश जाधवराव, श्रीकांत जाधवराव, दिपाली देशमुख -जाधवराव यांनी सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा लोणकर यांनी केले. आभार अक्षदा आढाळगे यांनी मानले.

राजकीय

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवड
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवड

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१७:

भारतीय जनता पार्टीचे सासवड येथील निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते बाळासाहेब इटकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.


बाळासाहेब इटकर सध्या “वडार कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया” या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये जबाबदारी सांभाळलेली आहे. भटके विमुक्त समाजाबद्दल त्यांच्याकडे सखोल अभ्यास आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना ही जबाबदारी पुन्हा एकदा दिलेली आहे. भटक्या विमुक्त समाजातील लोकांकरता तांडा सुधार प्रकल्पांतर्गत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचा व प्रत्येक भटक्या समाजातील लोकांना ओळखपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीशआप्पा जगताप, जेजुरी देवसंस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. विश्वास पानसे, सासवड मंडल अध्यक्ष आनंद भैय्या जगताप, सरचिटणीस उदयनराज जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनकाका भैरवकर, वीरेश दहिवले भगवान पवार आदी मान्यवरांनी बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातील २६ जूनच्या महामोर्चाला चर्मकार विकास संघाचा जाहीर पाठिंबा
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातील २६ जूनच्या महामोर्चाला चर्मकार विकास संघाचा जाहीर पाठिंबा

Latest News

नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेट

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१० सप्टेंबर,२०२६: नेवसेवस्ती (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वीर (ता. पुरंदर) येथे क्षेत्रभेट दिली. यावेळी त्यांनी जलविद्युत निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली. मोठी यंत्र…

सानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१० सप्टेंबर, २०२६: सानिध्य फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्षा सौ. प्रतिमा प्रकाश जगताप यांच्या गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल…

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शौर्यगाथा – राजे उमाजी नाईक 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.७सप्टेंबर, २०२६: राजे उमाजी नाईकांचा इतिहास भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले सोनेरी पान आहे. सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्यक्रांतीवीर…

निधन वार्ता

(कै. चंद्रकांत काळे) 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि. ३ सप्टेंबर, २०२६: सोनोरी (ता. पुरंदर )येथील शेतीव्यावसायिक व माजी सरपंच चंद्रकांत अनंतराव काळे (वय ७९) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे…

डॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवड

(फोटो : डॉ.प्रविण जोशी) 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.३ सप्टेंबर,२०२६: गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामीण लेखक, कवी, संशोधक डॉ. प्रविण जोशी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातारा जिल्ह्याच्या सहसचिवपदी…

error: Content is protected !!