ग्रामपंचायत सिंगापूर व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था शिरूर यांचा संयुक्त विद्यमाने उपक्रम

🔳पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१ सप्टेंबर,२०२६:
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत सिंगापूर व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था शिरूर यांचा संयुक्त विद्यमाने पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावात राहणाऱ्या महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहनचालकाचा शिकाऊ परवाना देण्यासाठी सुरू केलेल्या प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांच्या सबलीकरणसाठी सिंगापूर ग्रामपंचायतीच्या व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था, शिरूर यांच्या वतीने या प्रशिक्षण वर्गाचा अनोखा उपक्रम ३१ ऑगस्टपासून आयोजित केला आहे.
महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी महिलांना २२ दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांसाठी ते मोफत आहे.
हा एक आगळावेगळा व नावीन्यपूर्ण उपक्रम असल्याने गावातील तरुण मुली, नवविवाहिता यांच्यासह अनेक महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. यामध्ये जवळपास ३५ हून अधिक महिलांची प्रशिक्षणासाठी नोंद झाली असून, सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोटर ड्रायव्हिंगच्या माध्यमातून महिलांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर सरपंच सौ.अर्चना राजाराम लवांडे, उपसरपंच श्री. विक्रांत सुरेश पवार, सदस्य श्री. विशाल शांताराम लवांडे, सदस्य श्री. सौरभ दिलीप लवांडे, सदस्य सौ.संगीता हनुमंत वारे, सदस्य श्रीम. चांगुणाबाई बाळकृष्ण वाघमारे, सदस्य सौ.मीना गणपत उरसळ ग्रामपंचायत अधिकारी नीलिमा सोमनाथ धाऊत्रे संस्थेचे अध्यक्ष पंकज साबळे ग्रामपंचायत कर्मचारी शुभम उरसळ व सर्व महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
🔳श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्थेचे अध्यक्ष 🔳. श्री.पंकज साबळे
“घर, संसार, मोलमजुरी, शेतीकाम यासाठी सतत राबणाऱ्या महिला, त्यांना यातून बाहेर पडायला मिळत नाही, त्यांच्या हातात कधी गाडीचे स्टिअरिंग येईल, अशी कल्पनाही मनात आली नव्हती. आपत्तीची महिला किमान वाहन चालविता आले पाहिजे, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविल्याने आम्ही याचा लाभ
घेत आहोत. ही कला अवगत झाल्यावर याचा आम्हाला दैनंदिन जीवनात, आर्थिक रीती करण्या, बाजारपेठेत शेतमाल पोहोचवण्यास फायदा होईल; तर उदरनिर्वाहासाठी काही महिला वाहतूक व्यवसायासाठीही पुढे येथील.
🔳सिंगापूर ग्रामपंचायत सदस्य🔳 श्री.विशाल शांताराम लवांडे
“गावात येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्याचा आमचा पहिलाच उपक्रम आहे. महिलांचा चांगला प्रतिसाद आहे, त्या प्रशिक्षणही चांगल्या प्रकारे घेत आहेत. ही कला लवकर अवगत करत आहेत. ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, निश्चितपणे महिलांना याचा फायदा होईल, त्या स्वावलंबी होण्यासाठी मदत होईल.”
