ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारचा उपक्रम

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२४ऑगस्ट,२०२६:
श्री भुलेश्वर मंदिर परिसरात एन.आय.एल.पी. नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत साक्षरता जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, सहसंचालक श्री. शशिकांत म्हेत्रे, सहाय्यक संचालक श्री. सतीश चौधरी, प्रोग्राम कॉर्डिनेटर श्री. रोहित यादव, उपस्थित होते.
या प्रसंगी श्री भुलेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळशिरस, सन ब्राईट इंग्रजी मिडीयम शाळा या शाळांच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून, पथनाट्य आणि साक्षरता गीते सादर केली. तसेच असाक्षर नोंदणी केली.


या प्रसंगी श्री. कृष्णकुमार पाटील यांनी सर्वांना साक्षरतेची शपथ दिली आणि योजना विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा, एन.एम.एम.एस, इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, इतर शिष्यवृत्ती अशा विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमप्रसंगी पुरंदर तालुका पंचायत समितीचे सदस्य तथा माळशिरस गावचे माजी सरपंच माऊली यादव, पुरंदर तालुक्याचे गटविकास अधिकारी अविनाश थोरात, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख उमेश नेवसे, भुलेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक मंडळ तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!