
(फोटो : सिंगापूर (ता. पुरंदर) येथे नारायणपूर येथील पोपट महाराज टेंबेस्वामी, श्री क्षेञ नारायणपूर दत्त मंदिराचे व्यवस्थापक,भरतनाना क्षीरसागर यांच्या हस्ते कलश पूजन करीत असताना शेजारी विक्रांत पवार व इतर मान्यवर)
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१सप्टेंबर ,२०२६:
विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ व सिंगापूर ग्रामस्थ यांच्या वतीने सिंगापूर (ता.पुरंदर) येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ श्री क्षेत्र नारायणपूर येथील पोपट महाराज टेंबेस्वामी, श्री क्षेञ नारायणपूरचे व्यवस्थापक, भरतनाना क्षीरसागर व शिवसेना नेत्या ममता शिवतारे-लांडे यांच्या हस्ते कलश पुजन करून करण्यात आला.
सकाळी ७ वा. मंदिर प्रवेश, प्राणप्रतिष्ठा, नवग्रह होम हवन त्यानंतर मूर्तींना अभिषेक दु. १.३० ते २ कलशस्थापना असा कार्यक्रम करण्यात आला. सनराइज् कंपनीचे राजेंद्र मोरे यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. दु.३ ते ४ होम हवन सायं. ७ ते ९ विठ्ठल आध्यात्मिक शिक्षण संस्था यांच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम होऊन, कलशारोहण कार्यक्रमाची सांगता झाली, असल्याची माहिती सरपंच अर्चना लवांडे, उपसरपंच विक्रांत पवार व सिंगापूरकर ग्रामस्थ यांनी दिली.
या वेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव सतिश उरसळ, जि.प. सदस्या रुपाली झेंडे, माजी जि. प. सदस्या ज्योती झेंडे, पं.स. उपसभापती प्रविण जगताप, माजी उपसभापती दत्ता काळे, पं.स.सदस्या अर्चना कटके, सरपंच अर्चना लवांडे, उपसरपंच विक्रांत पवार, पुरंदर शिवसेना तालुका प्रमुख उमेश गायकवाड, मा.सरपंच दशरथ लवांडे, माऊली कोरडे, अशोक लवांडे, रामभाऊ उरसळ, मा. उपसरपंच विशाल लवांडे, मा. सरपंच संगीता वारे, मा. उपसरपंच विशाल लवांडे, मा. उपसरपंच सौरभ लवांडे, किर्लोस्कर न्यूमॅटिक कामगार संघ अध्यक्ष संदीप लवांडे, मा. सरपंच सुनंदा गोसावी, प्रविण लवांडे, श्रीहरी लवांडे, काळुराम लवांडे, बाजीराव गोसावी, अक्षय उरसळ, बाळासाहेब कोरडे आदींसह विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे सदस्य,
सिंगापूरकर ग्रामस्थ उपस्थित होते.

