तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला नवी दिशा
दि. २९ मे २०२६

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या ठाणे व मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. हा भव्य नियुक्ती सोहळा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पार पडला. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या न्याय, हक्कांसाठी सदैव उभी राहताना पाहायला मिळते.

त्याच अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रातील डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, तसेच डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने, डिजिटल पत्रकारांचे न्याय हक्क व संरक्षण हे विषय लक्षात घेऊन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त श्री एस. एम. देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, विभागीय सचिव दीपक कैतके, विभागीय सहसचिव दीपक पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग मस्के, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होणे, तसेच पत्रकारिता कशाप्रकारे केली पाहिजे, याचे मार्गदर्शन व संघटनेबाबत राजा आदाटे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले. तसेच ज्येष्ठ पत्रकार मनोज भोयर, मिलिंद अष्टीवकर, दीपक कैतके, अनिल वाघमारे यांनी उपस्थित पत्रकारांना डिजिटल मीडिया बाबत मार्गदर्शन करून, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुंबई डिजिटल पत्रकार परिषदेवर मनोज भोयर (अध्यक्ष), गणेश के. जगताप (कार्याध्यक्ष), विनोद कांबळे (उपाध्यक्ष), केतन खेडकर (सचिव), सतशील मेश्राम (कोषाध्यक्ष), उदय कासारे (सहसचिव), महादेव दौंड (सदस्य), बॉबी शेख (सदस्य) अशा नियुक्ती करण्यात आल्या. तसेच ठाणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेव चंद्रभूषण विश्वकर्मा (अध्यक्ष), संतोष खरात (कार्याध्यक्ष), इरफान कुरेशी (उपाध्यक्ष), सुनीलकुमार विश्वकर्मा (खजिनदार), अजय मगरे (सचिव), जया विश्वकर्मा (सदस्य), भगवानदास विश्वकर्मा (सदस्य) व नेहा गायकवाड मौर्य यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. पत्रकारांची मातृसंस्था संबोधली जाणाऱ्या व 87 वर्षाची परंपरा असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई कार्यकारिणीची ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुंबई कार्यकारणी मध्ये राजकुमार आदाटे (अध्यक्ष), दीपक कैतके (विभागीय सचिव), दीपक पवार (जनरल सेक्रेटरी), विनायक सानप (उपाध्यक्ष), विशाल परदेशी (विभागीय उपाध्यक्ष), पांडुरंग मस्के (कोषाध्यक्ष), परेश समजिस्कर, सुरेश ढेरे, रवींद्र भोजने, सुरेश गायकवाड, शिरीष वानखेडे, उमेश शेट्ये यांची सदस्य म्हणून नियुक्ती करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्ती सोहळ्या दरम्यान नवीन उपस्थित पत्रकारांचा संघटनेत सहभागी होण्याचा उत्साह दिसून आला. दीपक पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच पांडुरंग मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.
