ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधी मंदिराचा जिर्णोद्धार

श्रीकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण समारंभ


🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳  दि.३०:

  पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील पठारीमंडण/ चांबळीगाव येथे श्रीगुरूंच्या चरणातून चंद्रकोर आकार देऊन वाहणारी चरणावती/ भोगावती  नदीकाठवर असलेले ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ- जोगेश्वरी मंदिराजवळील कबीर-वाड्यात शिर्डीचे साईबाबांचे गुरु श्री.सद्गुरू शहामुनी महाराजांची संजीवन समाधी आहे. या समाधी कबीर-मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. यानिमित्त श्रावण नारळी पौर्णिमा गुरुवार दि. 27/ 8/ 2026 रोजी कबीर-वाड्यात श्रीकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी आणि कलशारोहण आचार्य मंदार स्वामी येनपुरे यांच्या हस्ते झाला. हा सोहळा चांबळीगाव ग्रामस्थ    आणि भाविकांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. यापूर्वी समाधी स्थळाचे बांधकाम अत्यंत साध्या स्वरूपाचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून पावसचे स्वरूपानंद स्वामी आणि भिवडीगावचे साधूबाबा यांची मनोमन इच्छा होती.
इ.स. 2019 रोजी श्री विजय महाराज भिसे यांना श्री सद्गुरु शहामुनी महाराज यांनी दृष्टांत दिला की माझ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्या अगोदर भिसे वाड्यातील मोठ्या आई मंदिराचा जिर्णोद्धार करावा कारण “मोठी आई देवी ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची आई आहे.” मी तुमच्या बरोबर आहे.”हा दृष्टांत झाल्यानंतर काही दिवसांनी विजय भिसे महाराजांना शहामुनी महाराजांनी श्रीकृष्ण रूपामध्ये दर्शन देऊन अनुग्रह दिला . या अशा अनेक घटनेनंतर विजय भिसे महाराजांनी इ.स. 2019 रोजी प्रथम ‘मोठीआई ” मंदिराचा जीर्णोद्धार केला . नंतर चांबळी ग्रामस्थ आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने कबीर- मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेऊन ते काम इ.स. 2026 मध्ये पूर्ण केले.

🔳  शहामुनी महाराजांचा आध्यात्मिक प्रवास 🔳

शहामुनी महाराज यांच्या पूर्वजा  संदर्भात थोडक्यात माहिती: – शहामुनी महाराजांच्या पंजोबांचे नाव ” शहाबाबा’ होते. शहाबाबा भक्ती ,ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण होते. ते हिंदू सनातन धर्माचे अनुयायी असून वाराणसी येथे महादेवाची पूजा करत. औरंगजेबाच्या काळात शहाबाबांना बळजबरीने धर्मांतर करण्यात भाग पाडले होते. त्यानंतर ते अवंतिकेमध्ये आले. त्यांना मुलगा झाला त्यांचे नाव जनाजी ठेवले. जनाजी महाराष्ट्रात सिद्धटेक मध्ये आले. त्यांना मानसिंग हा मुलगा झाला. त्यानंतर हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे आले तेथे मानसिंग यांना शके 1641 म्हणजे इ. स. 1719 मध्ये मुलगा झाला त्याचे नाव पंजाच्या नावावरून “शहाबाबा ” ठेवले. शहाबाबा म्हणजेच शहामुनी महाराज वयाच्या 16 वर्षापर्यंत आई-वडिलांबरोबर राहिले. त्यानंतर त्यांनी भारत आणि भारताच्या बाहेरही ईश्वर शक्तीचे मूळ वास्तव्य कोठे आहे. या संदर्भात प्रवास केला. अनेक संत सद्गुरूंचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या हातून अनेक चमत्कार आपोआप होत होते. त्यावेळेस त्यांनी महानुभव पंथाची दीक्षा घेतली होती. या काळात त्यांनी आपल्या आई-वडिलांना म्हणजेच मानसिंग आणि आमाई यांना घेऊन जालना जिल्ह्यातील  ” शहागड ” किल्ल्यामध्ये राहू लागले .तेथे शहामुनी महाराजांचे पादुका मंदिर आहे. तिथे आजही महानुभाव पंथी लोक दर्शन घेण्यासाठी येतात.
त्यानंतर इ. स.1753 ला महावतार बाबाजी म्हणजेच परमहंस मुनींद्र स्वामी म्हणजेच श्री सद्गुरू चरपटीनाथांचा नाथपंथीय अनुग्रह झाला.  त्यानंतर श्री सद्गुरू चरपटीनाथ महाराजांनी .इ.स.1760 संजीवन मंत्राचा उपद्देश केला. त्यानंतर इ.स.1761 रोजी पानिपत मध्ये युद्ध झाले या युद्धामध्ये महादजी शिंदे यांना जिवंत करून त्यांच्या घरी ग्वाल्हेरला आणले. त्यानंतर शहामुनी महाराज हे इ.स. 1761 ला पुरंदर तालुक्यात सासवड येथील सोपानदेव मंदिरात आले. संत सोपानदेव मंदिरात साधना केल्यानंतर ते पठारीमंडण चांबळीगावी श्रीगुरु मंदिरात आले आणि श्री सद्गुरू चरपटीनाथांच्या कबीरवाड्यामध्ये राहू लागले . या चांबळीगाव पठारीमंडण परिसरातच त्यांनी अनेक ठिकाणी तपसाधना केली. तपसाधना केल्यानंतर त्यांनी श्री सद्गुरू चरपटीनाथांच्या सांगण्यावरून बारामती जवळील मुढाळेगाव शिवाऱात आले . तेथे त्यांनी इ.स. 1764 ते 1776 मध्ये संजीवन मंत्राची 12 वर्षे तपश्चर्या केली. ‌

🔳 मानव उद्धारासाठी शहामुनी महाराजांनी श्री “सिद्धांत बोध ” ग्रंथ लिहिला 🔳

   शहामुनी महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर परमहंस मुलींद्र स्वामी म्हणजेच श्री सद्गुरु चरपटीनाथ महाराजांनी सांगितलेल्या संजीवन मंत्राची मुंढाळेगाव शिवारात वडाच्या झाडाखाली तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी पठारीमंडण‌ चांबळीगावाला येऊन श्रीगुरु मंदिरात
(बाणेश्वर मंदिरात ) शके 1698 ते शके 1700  म्हणजे इ.स. 1778 मध्ये चैतन्य तत्त्वाचा  ” श्री.सिद्धांतबोध” ग्रंथ लिहून पूर्ण होत होता.  ह्या श्री सिद्धांतबोध ग्रंथाच्या ओव्या शहामुनी महाराज  सांगत आणि त्यांचे शिष्य पंढरपूर मध्ये भेटलेले पाडळीचे श्री पांढरकामे लिहून घेत. याच काळात शके 1700 मध्ये गोपगाव जवळील कानिफनाथ गड येथे श्री सद्गुरु कानिफनाथ महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. अशा कानिफनाथ पीराचे मंदिर बांधून त्या मंदिराचा दगडी  दरवाजा 9 x11 इंच इतका संजीवन मंत्रांनी तयार केला. या  छोट्याशा दरवाजा  मधून पसरून जावे लागते आणि कानिफनाथांचे दर्शन घेतल्यानंतर त्याच पद्धतीने माघारी यावे लागते.
  त्यानंतर पठारीमंडण चांबळीगाव येथील श्रीगुरु मंदिरात येऊन सर्व शिष्यांना आणि पठारीमंडण मधील ऋषीमुनींना आमंत्रण दिले की सर्वांनी  श्रीगुरु मंदिरात यावे. सर्व शिष्यवर्ग आणि ऋषीमुनी भाविकभक्त आल्यानंतर श्रीगुरु मंदिरात श्री सिद्धांत बोध ग्रंथातील 5 ओव्या पांढरकामे यास लिहायला सांगून तक्तक्षणी शहामुनी महाराजांनी समाधी घेतली . या 5 ओव्या पुढीलप्रमाणे—आता हीच मंगळ  आरती ll मी नाही तुचि गुरुमूर्ती ll जीवभाव समर्पिला तुजप्रती ll शेवटचे लळीत अवघा तू ll 494 ll मीपणाचा धूप जाळिला ll कापूर पंचप्राण ज्योत प्रकाशला ll आनंद टाळी हर्ष बुक्का उधळिला ll गजर केला नामाचा ll 495 ll झाली लिहावयाची सीमा ll लेखणी वाहिली गुरुपादपद्या ll शहामुनीचा आत्मा अष्टभावे निवाला ll496 ll केले कष्ट गेले सिद्धी ll तन्मय शहामुनीची बुद्धी ll झाली कार्याची सिद्धी ll लेखणी सीमा येथोनी ll 497 ll शके सत्राशांत जाण ll ग्रंथ समाप्त झाला पूर्ण ll चांबळी ग्रामाकडे पठारीमंडण ll येथे लिहिला हा ग्रंथ ll498 ll श्रीगुरु मंदिरात शहामुनी महाराजांची समाधी झाल्यानंतर त्यांना कबीर- वाड्यात नेले तेथून त्यांना अलुबापीराकडे नेहाचे होते. त्यावेळेस त्यांनी कबीर- वाड्यातील दरवाजाला दोन्ही पाय लावले आणि देहाने जागृत होऊन सांगितले की मला याच कबीर- वाड्यात समाधी करून ठेवा. पूर्वीच नियोजित जागा शहामुनी महाराजांनी तयार केलेलीच होती. हिंदू धर्माप्रमाणे त्यांना समाधी देण्यात आली .वरती त्यांनीच पीराची स्थापना करण्यास सांगितलेली होते. अशा पद्धतीने शहामुनी महाराजानी श्री सिद्धांतबोध ग्रंथ समाप्ती आणि‌ संजीवन समाधी शके 1700 मध्ये म्हणजेच इ.स. 1778 मध्ये झालेली आहे. आज रोजी या  संत शहामुनी महाराज संजीवन समाधीस 248 वर्षे पूर्ण झालेली आहेत. शहामुनी महाराजांची स्मृती आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन व्हावे या उद्देशाने श्री विजय महाराज भिसे यांनी चांबळी ग्रामस्थ आणि भावी भक्तांच्या सहकार्याने कबीर-मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले या कबीर- वाड्याचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर झालेल्या श्रीकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळ्यामुळे या ऐतिहासिक शहामुनी महाराज संजीवन समाधी मंदिराला नवे रूप प्राप्त झाले आहे.                               

🔳 ग्रामस्थ, महिला आणि भाविक भक्तांची मोठी संख्या 🔳

  या सोहळ्यास श्रीकृष्ण भक्त सुधीर सरनोबत साहेब, श्री संत सोपानदेव महाराज मंदिर मुख्य विश्वस्त त्रिगुणदादा गोसावी, सौ आरतीताई मारणे, सौ वंदनाताई गोरे, सौ शुभांगीताई जाधव, श्रीमती नंदाताई नेटके सौ पूजाताई सबनीस, कोल्हापूरचे कृष्णनाथ महाराज सुतार , श्री सुशांतजी पवार, श्री प्रकाशभाऊ तरस, श्री प्रशांत एडवी, श्री संदीप महाराज टिकले , चांबळीगावचे माजी उपसरपंच पोपटआबा शेंडकर , कैलास उद्धवराव शेंडकर, देवराम दादा कामठे. मारुती कामठे, श्रीरंग कामठे  असे अनेक संत महात्मे , मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ह.भ. प. राजेंद्र महाराज दहिभाते यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. किर्तन साथ भैरवनाथ भजनी मंडळ चांबळी यांनी केली त्यात ह.भ.प.मस्कु महाराज कामठे , ह. भ.प.संभाजी महाराज बडदे, ह. भ.प.भरत महाराज कामठे. ह. भ. प .चोपदार बाळासाहेब शेंडकर इ. महाराज लोक आणि चांबळी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!