ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

गुरोळी येथील अंगणवाडीत वेलकम मेळाव्याचे आयोजन


🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳  दि.२६ :

     शासनाच्या नवचेतना व आधारशिला कार्यक्रमांतर्गत
वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल अशी प्रतिपादन पुरंदर तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी केले.
   माळशिरस (ता. पुरंदर) बीटातील अंगणवाडी क्रमांक ६ गुरोळी व अंगणवाडी क्रमांक ७ लालवाडी  येथे नवचेतना व आधारशिला कार्यक्रमांतर्गत वेलकम मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन प्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका, बालकांच्या मातांना मार्गदर्शन करताना श्री. अनिल कांबळे बोलत होते.
    यावेळी गुरोळी व लालवाडीतील मान्यवर ग्रामस्थ, माळशिरस बीटच्या पर्यवेक्षिका सौ. अरुणा दत्तात्रय खेडेकर, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडीतील बालकांच्या माता उपस्थित होत्या.

(फोटो – गुरोळी (ता. पुरंदर) येथे वेलकम मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अनिल कांबळे,माया खेडेकर,अरुणा खेडेकर,वंदना खेडेकर ,विमल माकर, ज्योती वाघमारे व इतर)


    कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका सौ. वंदना बापूसाहेब खेडेकर सौ. माया पांडुरंग खेडेकर व मदतनीस विमल सोपान माकर सौ. ज्योती दत्तात्रय वाघमारे यांनी केले.
   सदर कार्यक्रमात विविध पाककृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी वेलकम मेळाव्यामध्ये बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकासासाठी विविध स्टॉल लावून त्याच्या माध्यमातून पालकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.
  बालकांच्या जन्मपूर्व ते ३ वर्ष, तसेच ३ वर्ष ते ६ वर्षाच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच माता पालक, ग्रामस्थ व समुदाय, अंगणवाडी व प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त समन्वयाने नवचेतना आणि आधारशीला उपक्रम राबवण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ. अरुणा दत्तात्रय खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. माया पांडुरंग खेडेकर यांनी केले. आभार सौ. वंदना बापूसाहेब खेडेकर यांनी मानले.

error: Content is protected !!