पुरंदर तालुका नाभिक महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशील गायकवाड, सचिवपदी स्वप्नील शिंदे

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२०सप्टेंबर,२०२६:
पुरंदर तालुका नाभिक महामंडळ कार्यकारिणीची नुकतीच बैठक संपन्न होवून, तालुका अध्यक्षपदी नीरा येथील सुशील गायकवाड तर सचिवपदी सासवड येथील स्वप्नील उर्फ बंटी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पुरंदर तालुका नाभिक महामंडळाची कार्यकारिणीची निवड व शूरवीर जिवाजी महाले जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात झाली. कोअर कमिटीचे मुन्ना शिंदे, नितीन राऊत तसेच संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे व डॉ. मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
या बैठकीत मागील बारा वर्षे अध्यक्षपदावर राहुल मगर यांच्या कार्यकारिणीने उत्कृष्ट केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या बैठकीत अध्यक्षपदी सुशील गायकवाड, कार्याध्यक्ष मल्हार राऊत, उपाध्यक्ष मनोज जगताप, संजय क्षीरसागर, सचिव स्वप्नील शिंदे, सहसचिव प्रवीण साळुंखे, खजिनदार पांडुरंग काशिद, कार्यकारिणी सदस्य संतोष पांडे, अमोल राऊत, रामदास क्षीरसागर, संतोष विभाड, अमोल गवळी, दत्तात्रय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शूरवीर जिवाजी महाले यांची शासकीय पातळीवर जयंती साजरी करावी. नाभिक समाजाचे शौर्याचे प्रतीक व छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची शासकीय पातळीवर जयंती साजरी व्हावी, अशी मागणी समाजाचे नेते मुन्ना शिंदे यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे, मुन्ना शिंदे यांनी सांगितले.
१० ऑक्टोबर रोजी सासवड येथे जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून, यावेळी जिवाजी महाले यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान, समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुशील गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी सासवड शहर अध्यक्ष पोपट राऊत, अमित शिंदे, सूरज क्षीरसागर, जेजुरी शहर अध्यक्ष उमेश गायकवाड, नीरा शहर अध्यक्ष नंदकुमार काशवेद ,ज्येष्ठ कार्यकर्ते सुशील राऊत,वैभव शिंदे,बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीचे पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष नीलेश पांडे, चंद्रकांत जगताप यांनी अभिनंदन केले.
