ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.११ऑक्टोबर,२०२६:
नवी मुंबईतील कळंबोली येथे शारदीय नवरात्रोत्सवच्या पवित्र पर्वावर कळंबोलीची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिरामध्ये डॉ. गोरखनाथ पोळ व अंजना महादेव पोळ लिखित ‘नवरात्रीचे नऊ रंग’ या माहितीपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. नवरात्रोत्सव नऊ दिवसच का साजरा केला जातो, देवीची नऊ रूपे कोणती, नवरात्रोत्सव आपल्याला काय शिकवते, नवरात्रीत कोणत्या आरत्या म्हटल्या जातात, विजयादशमीचे महत्त्व काय आणि दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून का वाटली जातात, अशा विविध प्रश्नांची माहिती या पुस्तकातून सोप्या आणि रंजक भाषेत देण्यात आली आहे.


नवरात्रोत्सवापासून ते विजयादशमीपर्यंतच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरा, देवीची उपासना, आरत्या, पूजनपद्धती आणि संस्कारांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. अंजना प्रकाशनचे हे पहिलेच पुस्तक असून, एस नॅपकिन बुके, सत्कार हाऊस च्या डायरेक्टर मानसी पोळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पुस्तकाचे प्रकाशन आप्पासो (नाना) खलाटे, सौ. जयश्री खलाटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अमित पोटे व मंगेश गायकर खजिनदार अविनाश अब्दगीरे सेक्रेटरी गणेश शिंदे, रामदास पोळ, स्वाती पोळ, मानसी पोळ, जहागीरदार सर, संदीप खलाटे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लेखक डॉ. गोरखनाथ पोळ यांनी हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि भारतीय संस्कृती व परंपरांचा वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी सामाजिक व नवरात्रोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

error: Content is protected !!