ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : उमेश शेट्ये
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया संकल्पना सुरू केलेली असून, त्यानुसार “खेलो इंडिया” यांचे सूचनेनुसार 3 जुन 2026 जागतिक सायकल दिन असल्याने दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 06 ते 08 या वेळेत रविवार “संडे ऑन सायकल” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम, यांनी खेळाडू सोबत स्वतः सायकल रॅली मध्ये सहभागी होऊन तरुण पिढीला आरोग्य व स्वास्थ्याबाबत संदेश दिला. सदरची रॅली कुडाळ पोलीस ठाणे एस. एन. देसाई चौक पानदूर ते कुडाळ पोलीस ठाणे अशी घेण्यात आली.

सदर रॅलीकरता मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग श्री. रवींद्र खेबूडकर, पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय श्रीमती श्वेता खाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, कणकवली श्री घन:शाम आढाव पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, श्री अतुल जाधव, अमोल चव्हाण तसेच इतर पोलीस अधिकारी अंमलदार आणि क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. रॅली मध्ये 70 सायकल स्वार उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी रॅली करीता सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!