ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

कोडीत गावच्या श्रीनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक महिला ग्रुपने पटकावला प्रथम क्रमांक

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२४ऑगस्ट,२०२६:
श्रावणातील पारंपरिक सण-उत्सवांना आधुनिक सांस्कृतिक महत्त्व पटवून देण्यासाठी गराडे (ता. पुरंदर) येथे डॉ. ममताताई शिवतारे फाऊंडेशन प्रस्तुत पुरंदर महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने ‘श्रावणसखी महोत्सव’ उत्साहात पार पडला.
मंगळागौर स्पर्धेत विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी गाणी, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
दिवे – गराडे गणातील महिलांसाठी आयोजित या महोत्सवमध्ये उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट ग्रुप, उत्कृष्ट लिटल चॅम्प, ग्रुप गायन तसेच नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून महिलांनी एकापेक्षा एक सरस गाणी व नृत्य
सादर केले.

तसेच पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांनी कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक सादरीकरणातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. डॉ.ममता शिवतारे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री नाथ जोगेश्वरी सांस्कृतिक महिला ग्रुप कोडीत, द्वितीय क्रमांक गराडे मठवाडी महिला, तृतीय क्रमांक कोडीत, चतुर्थ क्रमांक: प्रणिता बडदे शिवगर्जना व सहभागी ग्रुपला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी डाॅ. ममता शिवतारे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना वैशाली काळे, माजी जि.प. सदस्या व पुरंदर तालुका प्रमुख ज्योतीताई झेंडे, तालुका संघटक प्रियंका सुकल, उपतालुका प्रमुख अलका बडदे, दिपाली भोराडे, सुप्रिया रावडे, प्रियंका कटके, प्रतिभा कदम यांच्यासह परिसरातील व गावातील महिलांची मोठी उपस्थिती होती. श्रावणसखी महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच आपल्या समृद्ध मराठमोळ्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध कला सादर केल्या असे उपजिल्हाप्रमुख शिवसेना वैशाली काळे यांनी सांगितले.


महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल, असे विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरण करताना डॉ.ममता शिवतारे यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षीही श्रावणातील पारंपरिक मंगळागौर खेळ, कला व सांस्कृतिक
सादरीकरणातून महिलांनी जुन्या परंपरांना उजाळा दिला आहे
प्रणिता बडदे यांनी सांगितले.

error: Content is protected !!