ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२२ऑगस्ट, २०२६

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेच्या पुरंदर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या शाळेमध्ये 22 ऑगस्ट रोजी वारसा स्वराज्याचा या कार्यक्रमांतर्गत देशी-विदेशी दुर्मिळ नाण्यांचे भव्य प्रदर्शन तसेच शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. इतिहासाची सुवर्णपाने केवळ पुस्तकी ज्ञानापूरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या समृद्ध संस्कृती, अर्थशास्त्र व शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. वारसा स्वराज्याचा संग्रहालय व न्यू इंग्लिश स्कूल मांडकी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू व नाण्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक कालखंड, चलन व्यवस्था व राजकीय स्थित्यंतरे समजावून देणे हे या कार्यक्रमातून साध्य करण्यात आले.


या कार्यक्रमातील नाण्यांचे संग्रहक विलास जगताप यांनी जमवलेल्या दुर्मिळ व मौल्यवान देशी-विदेशी नाण्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यालयातील २६८ विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रूपाली शिंदे मॅडम यांनी केले. नाणी संग्रहक विलास जगताप यांनी जमलेल्या दुर्मिळ व मौल्यवान संग्रहित नाण्यांबद्दल माहिती दिली.  यात त्यांनी प्राचीन भारतीय कालखंड शिवकाळ पेशवे काळ ब्रिटिश राजवट यांच्यासह जगातील विविध देशातील अत्यंत दुर्मिळ नाणी जमवलेली पाहायला मिळाली. तसेच विलास जगताप यांनी प्रत्येक नाण्याचे ऐतिहासिक महत्त्व, त्यावरील मोडी, फारशी व ब्राह्मणी लिपी, नाण्यांचे वजन आणि त्या त्या काळातील समृद्ध आर्थिक व्यवस्था याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अतिशय सविस्तर व रंजक माहिती दिली.


विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत ढमाळ सर यांनी शिवचरित्राची सिंहगर्जना या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व स्वराज्याची निर्मिती विद्यार्थ्यांसमोर जिवंत केली. शिवछत्रपतींचे अलौकिक नेतृत्व, गनिमी कावा, अर्थशास्त्र आणि त्यांनी निर्माण केलेली शिवराई व होन ही स्वतंत्र नाणी यावर देखील मुख्याध्यापकांनी सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व नीती मूल्यांची रुजवणूक करण्याचे आवाहन त्यांनी केले.


यावेळी मानसिंग साळुंखे सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये या अशा ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मानसिंग तात्या जगताप, माजी सरपंच सतीश नाना जगताप, माजी उपसरपंच विजय बापू साळुंखे, नरसिंग जगताप, नितीन जगताप, विकास जगताप, रोहित भोसले, नवनाथ जगताप, पोलीस पाटील श्रीतेज जगताप, मोहन तात्या जगताप, सूर्यकांत जगताप, धनाजी शिंदे, संपादक गणेश जगताप, राहुल जगताप हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत माकर सर यांनी व आभार प्रदर्शन राहुल कसबे सर यांनी केले.

error: Content is protected !!