पुरंदर तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र गणेश केशव जगताप यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मुंबई कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. हा नियुक्ती सोहळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त श्री एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव उभी राहताना पाहायला मिळते. या संघटनेचे अध्यक्ष पद आचार्य अत्रे यांनी भूषवलेले होते. अशा संघटनेत पुरंदरचे गणेश जगताप यांची नियुक्ती होत आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळींनी तसेच पुरंदर तालुका पंचायत समिती उपसभापती श्री प्रवीण जगताप यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. तसेच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, विभागीय सचिव दीपक कैतके, विभागीय उपसचिव दीपक पवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.