ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 पुरंदर प्रतिनिधी🔳 दि.१२सप्टेंबर,२०२६:
दिवे (ता.पुरंदर) येथील कातोबा विद्यालय माजी विद्यार्थी सभागृहात अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय, एस.आर. ट्रस्ट रतलाम आणि अलीमको मुंबई तसेच जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेखा ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन पुरंदर पंचायत समिती सभापती अमित झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.


३३ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपर तात्काल मोजमाप आणि फिटिंग करून देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी अविनाश थोरात, विस्ताराधिकारी संतोष नेवसे, बबन चखाले, निकेतन धापटे, ग्रामपंचायत अधिकारी काशीपती सुतार, राहुल साबळे, समाज कल्याण प्रहार संघटना महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे, संपर्क प्रमुख विजय तांबे, पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण रविंद्र मोरे, देवराम सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.


दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नियोजन दिवे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी काशीपती सुतार, मनोज क्षीरसागर, विशाल पवार यांनी केले.

error: Content is protected !!