
(कै. चंद्रकांत काळे)
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि. ३ सप्टेंबर, २०२६:
सोनोरी (ता. पुरंदर )येथील शेतीव्यावसायिक व माजी सरपंच चंद्रकांत अनंतराव काळे (वय ७९) यांचे अपघाती निधन झाले.
त्यांच्या मागे बंधू ,बहीण ,पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सुप्रसिद्ध निवेदक जालिंदर काळे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. तर शेती व्यावसायिक दिपक काळे, प्रविण काळे व गृहिणी शैला झिंझुरके यांचे ते वडील होत.
