ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳(सुरेश गायकवाड):

  गेली २० वर्षेाहून अधिक सरकारला शेकडो निवेदने, आंदोलन करून ही  सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता सरकारने ३० जून पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मंत्रालयासमोर मांग-गारुडी समाज १ जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मांग-गारुडी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमर कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिला.


  मांग-गारुडी समाजाच्या विकासासाठी ५०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा, मांग-गारुडी समाजाचे स्वतंत्र समाज भवन मुंबई येथे उभारण्यात यावे, मांग-गारुडी समाजाच्या विकासासाठी अभ्यास आयोग नेमण्यात यावा, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाचे प्रश्न विधान भवनामध्ये मांडणारा विधान परिषद सदस्य नेमण्यात यावा, मांग-गारुडी समाजातील बेघर कुटूंबाला संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार घरकुल मंजूर करण्यात यावेत.


तसेच मागासवर्गीय शासकीय कार्यालयात मांग-गारुडी समाजातील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्यांमध्ये विशेष प्राधान्य देण्यात यावे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत पाच एकर जमीन मांग-गारुडी समाजातील भूमीहीनांना देण्यात यावी.
 

  मांग-गारुडी समाजाचे जात दाखल्यांमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात तसेच मांग-गारुडी संघटनांच्या शिफारसीवर जातीचे दाखले देण्यात यावेत. समाज कल्याण योजने अंतर्गत मांग-गारुडी समाजातील उद्योजक घडवण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात यावा. मातंग समाजाची पोट जातीमधून वगळून आम्हाला आमची स्वतंत्र जातीचा दर्जा मिळावा, कारण आम्ही मातंग समाजाची पोट जात नाही.

error: Content is protected !!