
🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२६ (सुरेश गायकवाड):
नवी मुंबई मध्ये लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक उपायुक्त कार्यालय समाज कल्याण कोकण भवन बेलापूर येथे सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
तसेच हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
