ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

सर्प मित्रांच्या फलकांसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२६ (सुरेश गायकवाड) :

नवीमुंबई मधील खारघर सेक्टर-११ येथील शिखर गृहनिर्माण सहकारी संस्था, प्लॉट क्रमांक २० समोरील रस्त्यावर अचानक साप आढळल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साप दिसताच स्थानिक नागरिकांची धावपळ उडाली.

यावेळी स्थानिक रहिवासी सतीश भोसले, शैलेश देशमुख आणि महादेव हिमणे यांनी प्रसंगावधान राखत त्वरित सर्पमित्राशी संपर्क साधून त्यांची मदत मागितली. घटनास्थळी उपस्थित असलेले प्रतिष्ठित ज्येष्ठ आणि सर्वपरिचित डॉ. विजयकुमार बोरुडे यांनीही नागरिकांना सहकार्य करत मार्गदर्शन केले. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे साप व इतर सरपटणारे प्राणी सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर येणे ही नैसर्गिक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सापाला इजा करण्याचा प्रयत्न करू नये, सुरक्षित अंतर राखून त्वरित सर्पमित्र किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित स्थानिक रहिवासी आणि जबाबदार नागरिक जितेंद्र बनसोडे यांनी खारघर सेक्टर-११ रेसिडेंट असोसिएशनच्यावतीने पनवेल महानगरपालिकेकडे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः नाल्यालगत व संवेदनशील ठिकाणी अधिकृत सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक असलेले माहिती फलक लावण्यात यावेत, अशी त्यांनी विनंती केली.

याशिवाय महानगरपालिकेने नाल्यांची नियमित स्वच्छता, झुडपे हटविणे, जनजागृती फलक व सर्पमित्रांचे संपर्क फलक लावणे, तसेच पावसाळ्यात तातडीची बचाव यंत्रणा कार्यरत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांनी सतर्क राहून, साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता, त्वरित सर्पमित्र अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

error: Content is protected !!