ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी


🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 दि. ०४: (उमेश शेटये) :


  पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.03 जुलै 2026 रोजी 19:30 वाजण्याच्या सुमारास ओरोस खर्येवाडी खालसा पंजाबी ढाबा येथे गोवा कडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.
   सदर कारवाई मध्ये आरोपी गोपाळ राजाराम गवस. वय वर्ष 34, रा.दापोली अन्नपूर्णावाडी ता.सावंतवाडी, शिरीष सुभाष गवळी. वय वर्ष 35 रा.माठेवाडा सावंतवाडी व सिद्धेश सुभाष केसरकर  वय वर्ष 34 आळेवाडी बांदा सावंतवाडी,  यांच्यावर अन्नसुरक्षा व मानके कायदा सन 2006 चे कलम 26 (2),7 (3) (d), 27 (3)(इ), 30 (2) (ए), 59 तसेच भारतीय न्यायसंहिता सन 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(५) अन्वये कायदेशीर कारवाई केली आहे.
  सदर कारवाई मध्ये आरोपी यांच्याकडून 30,13,450/- ( तीन लाख तेरा हजार चारशे पन्नास रुपये) किंमतीचा एकूण मुद्देमाल पोलिसयांनी हस्तगत केला असून, त्यामध्ये 21,63,450/- ( एकवीस लाख त्रेसष्ठ हजार चारशे पन्नास रुपये) किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व अशोक लेलँड बडा दोस्त 8,50,000/- (आठ लाख पन्नास हजार रुपये) किंमतीची वाहतुक करणारी गाडी जप्त केली आहे.
 सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहीकर, अधीक्षक सिंधुदुर्ग मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जयकर , पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर, ऋषिकेश टोपले यांनी केली असून सिंधुदुर्ग पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!