ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

(फोटो: कोडीत (ता. पुरंदर) येथे यशस्वी विद्यार्थी वेदांत राजगुरूचा सन्मान करताना, लतीफ इनामदार व प्रतिभा बोत्रे समवेत शिक्षकवृंद)

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳दि.०४ ऑगस्ट, २०२६:

गराडे (दि.४) पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान व संशोधन क्षेत्राची ओळख व्हावी तसेच त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नासा व इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या निवड प्रक्रियेतील पहिल्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर दुसऱ्या परीक्षेचे उत्तम गुण मिळवत, पुरंदर तालुक्यातील कोडीत नं.१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी वेदांत सोपान राजगुरू याची निवड झाली.
वेदांतला मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक लतीफ इनामदार, संजय कुंभारकर, संजय जाधव, रेणुका मस्के, प्रतिभा बोत्रे, सविता जगताप, वंदना कामथे यांनी मार्गदर्शन केले.
वेदांत राजगुरू याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पालक, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इस्रो, नासा अभ्यास दौऱ्याच्या अंतिम मुलाखतीपर्यंत मजल मारल्याने कोडीत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वेदांतच्या या यशामुळे शाळेची परंपरा कायम राहिली आहे.
मागील वर्षी शिवम बडधे हा विद्यार्थी नासा (अमेरिका) अवकाश संशोधन संस्थेला भेट देऊन आलेला आहे.

error: Content is protected !!