ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०५ऑगस्ट, २०२६:

भिवरी (ता. पुरंदर) येथील सुनील रामदास गोफणे यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मोरगाव येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जय मल्हार क्रांती संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली. सदर बैठकीत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंती सोहळ्याच्या पूर्वनियोजनासह जय मल्हार क्रांती संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी, संघटनात्मक कामांचा आढावा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.


यावेळी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावचे सुपुत्र सुनील रामदास गोफणे यांची तालुका युवक अध्यक्षपदी निवड करून, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांचे हस्ते नियुक्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन, सत्कार करण्यात आला.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे सल्लागार समिती अध्यक्ष गणपतराव शितकल, राज्य कोअर कमिटीचे उपाध्यक्ष गंगाराम जाधव, राज्य सल्लागार उपाध्यक्ष बिट्टू भांडवलकर, राज्य कार्यकारिणी सदस्य लालासाहेब भंडलकर, अशोकराव चव्हाण, निलेश जाधव, खंडू जाधव, पुरंदर तालुका अध्यक्ष विकास भांडवलकर, सिताराम चव्हाण आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कोअर कमिटी उपाध्यक्ष गंगाराम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन गणपतराव शितकल यांनी केले. आभार पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांनी मानले.

error: Content is protected !!