ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१३ ऑगस्ट, २०२६:

हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत “न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी” या विद्यालयात सायकल रॅली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील मुले व मुली यांनी या उपक्रमात अत्यंत आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. विद्यालयातील १०५ विद्यार्थ्यांकडून, सायकलची सुंदर सजावट करून, प्रत्येक सायकलीला तिरंगी ध्वज लावण्यात आला होता. सायकल रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी मुख्याध्यापक श्री श्रीकांत ढमाळ सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मानसिंग तात्या जगताप तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री विजय बापू साळुंखे, सतीश नाना जगताप माजी उपसरपंच, राजाभाऊ शिंदे, प्रा. मानसिंग साळुंखे सर, विकास जगताप, बाळ जगताप तसेच गावचे पो. पाटील श्रीतेज जगताप, कांताबापू जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.


सायकल रॅली काढण्यापाठीमागचा उद्देश शाळेच्या मुख्याध्यापकांनी समजून सांगितला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीपासून ते राष्ट्रीय एकात्मता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच व्यवस्थापन चे अध्यक्ष यांनी शुभेच्छापर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विकास जगताप यांनी सुद्धा सायकलीचे महत्व पटवून दिले आणि सायकल रॅली साठी शुभेच्छा देऊन, सायकल रॅलीचा प्रारंभ केला. सायकल रॅली मांडकी गावात संपूर्ण रस्त्याने भारतमाता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये झाली. सायकल रॅलीला ग्रामस्थांनी अत्यंत आनंदाने शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


त्यानंतर सायकल रॅली मांडकी गावातून लपतळवाडी या ठिकाणी घेऊन जाण्यात आली. सर्व विद्यार्थी लपतळवाडी गावचे ग्रामदैवत लिमजाई माता मंदिर परिसरात थांबले. त्यानंतर लपतळवाडी गावातील सरपंच रवींद्र मोरे, मच्छिंद्र पिलाणे, महादेव पिलाणे, माजी सरपंच सतीश कदम, माजी सरपंच संदीप मोरे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नितीन पिलाणे, माजी सरपंच तसेच सुहास पिलाणे व गावातील ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. मुख्याध्यापक श्री ढमाळ सर यांनी संपूर्ण ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना सायकल रॅलीचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर माजी सरपंच महादेव पिलाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर असे उपक्रम विद्यालयात केल्यामुळे विद्यार्थी शिक्षक, पालक यांच्यात अत्यंत सुंदर समन्वय साधला जाईल, असे मत व्यक्त केले. त्यानंतर पुन्हा रॅली मांडकी विद्यालयात आली.
त्यानंतर तिरंगा सायकल रॅली पुन्हा मांडकी वरून पिसुर्डी गावचे ग्रामदैवत नाथ भैरवनाथ या मंदिरात घेऊन जाण्यात आली. यावेळी पिसुर्डी गावचे माजी उपसरपंच संजय चोरमले, सरपंच प्रदीप बरकडे, नवनाथ चोरमले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य काळे रामभाऊ माजी उपसरपंच, मुख्याध्यापक तांबेकर सर, राऊत सर आणि पिसुर्डी गावच्या ग्रामसेवक सौ कदम मॅडम यांनी रॅलीचे स्वागत केले. तसेच या रॅलीचे महत्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. नंतर सायकल रॅली पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या विद्यालयात परत घेऊन येण्यात आली.

त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री माकर सर यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. सदर सायकल रॅली चा उपक्रम विद्यालयामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री श्रीकांत ढमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढण्यात आली. या संपूर्ण रॅलीचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री राहुल कसबे सर यांनी केले. या उपक्रमामध्ये विद्यालयातील इतर सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अत्यंत आनंदाने सहभाग नोंदविला.

error: Content is protected !!