न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी येथे उत्साहात संपन्न

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳०५ऑगस्ट, २०२६:
न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी विद्यालयामध्ये भारतीय मानक ब्यूरो (BIS) स्टॅंडर्ड क्लबच्या वतीने पहिली ॲक्टिव्हिटी म्हणून ‘बॉलपॉईंट पेन’ (Ballpoint Pen) या विषयावर ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमात विद्यालयातील तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मानसिंग जगताप, साळुंखे सर, सतीश जगताप, विलास जगताप, विजय साळुंखे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत ढमाळ सर, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत माकर सर आणि गणित विभागाचे प्रमुख शंकर सुतार सर हे देखील उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर बीआयएस स्टॅंडर्ड क्लबच्या मेंटर शिक्षिका सौ. दिपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना ‘बीआयएस स्टॅंडर्ड क्लब’ चे महत्त्व, त्याची उद्दिष्टे आणि नियम सविस्तर समजावून सांगितले. न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत ढमाळ सर तसेच साळुंखे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, त्यांचे प्रोत्साहन वाढवले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. देवकी कदम हिने उत्कृष्टरीत्या केले. या प्रसंगी तेजस्विनी बरकडे हिने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना बीआयएस मानकांबाबतची प्रतिज्ञा दिली. त्यानंतर श्रेया लोळे, ऋतुजा चोरमले आणि देवकी कदम या विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनात आय.एस.आय प्रमाणित वस्तूच वापरण्याचा संदेश देणारी एक प्रबोधनात्मक नाटिका सादर केली.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बीआयएस स्टॅंडर्ड क्लबच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.
त्यानंतर ‘बॉल पेन’ विषयावर आधारित घेण्यात आलेल्या ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक: मानसी कैलास कदम, श्रेया नामदेव कदम,
द्वितीय क्रमांक: श्रेया बाळासो डोईफोडे, तेजस्वी साळुंखे, तृतीय क्रमांक: मानसी साळुंके, श्रेया जगताप, उत्तेजनार्थ: देवकी कदम, प्राजक्ता पिलाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आणि सहभागी ५६ विद्यार्थ्यांचे न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक श्री. ढमाळ सर, शिक्षकवृंद व पालकांकडून विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.
