
🔳 सोलापूर प्रतिनिधी 🔳 दि.१३जुलै, २०२६:
सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने सदरचे गुन्हे उघउकीस आणणेबाबत श्री. एम. राज कुमार पोलीस आयुक्त, डॉ.अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. दिलीप पवार सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सी.सी.टी.व्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करुन, मोटार सायकल चोरी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेत होते.
दिनांक 05/06/2026 रोजी फौजदार चावडी पो.स्टे सोलापूर शहर येथे गु.र.नं.479/2026, भा.न्या.सं. 2023 कलम 303(2) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा घडल्यानंतर स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देवून सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करुन सदरचा गुन्हा कोणी केला आहे? याबाबत माहिती घेत होते. संशयीत आरोपीचा शोध घेत असताना स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार विनोद रजपूत व इम्रान जमादार यांना दि.12/07/2026 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची होंडा युनिकॉर्न कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल घेवून सोलापूर मार्केट यार्ड हैद्राबाद रोड जवळ थांबलेला आहे. प्राप्त माहितीची खात्री करून स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून संशयीत इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर नमूद इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याचे नाव सत्यवान रामहरी भोसले, वय-32 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मु.पो. पडसाळी, ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने त्यास मोटार सायकलच्या मालकीहक्का बाबत चौकशी केली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्यावेळी त्या संशयीत इसमास अधिक विश्वासात घेवून पथकाने चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल काही दिवसांपूर्वी दुपारचे वेळेस वसंत विहार परिसरातुन चोरी केल्याचे कबुल केले. सदर मोटार सायकलचे असलेल्या आरटीओ क्रमांक -MH 13 DK 5511, चेसीस नंबर व इंजिन नंबर वरुन खात्री केली असता सदर मोटार सायकल वरील नमूद दाखल गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली.

त्यानंतर संशयीत इसमास अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्याने मागील काही दिवसांमध्ये सातारा, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातुन तसेच कर्नाटक राज्यातुन आणखी मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यामुळे सपोनि श्री. शैलेश खेडकर यांनी त्यास वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली. नमूद गुन्ह्याचे अधिक तपासामध्ये त्याने आणखी 13 मोटार सायकली काढून दिल्या असून त्या पंचनाम्याने हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
आरोपी नामे सत्यवान रामहरी भोसले याचे कडून हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकल व गुन्ह्यांबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.
अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहर हद्दितील 07, धाराशिव जिल्हयातील 05, सातारा जिल्हयातील 01 व कर्नाटक राज्यातील 01 असे एकुण 14 गुन्हे आंतरजिल्हा मोटार सायकल चोराकडून उघडकीस आणून त्याचेकडून एकुण 6,55,000/- रुपये (सहा लाख पंच्चावण्ण हजार/-) रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ.अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री.प्रितम यावलकर पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), श्री. दिलीप पवार सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.
