ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

कामोठे प्रतिनिधी दि. 5
कामोठे शहरात मागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक व पेन्शन धारक ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग यांचा एकत्रित संघ तयार झाला आहे. या ज्येष्ठ नागरिक संघटनेतून दररोज खांदेश्वर स्टेशन जवळील मैदानामध्ये शारीरिक व्यायाम करीत असतात. त्याचबरोबर मैदानामध्ये विविध सण-उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करत असतात. या कार्यक्रमांतून विचारांची देवाणघेवाण तसेच सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य या जेष्ठ नागरिक संघटनेतून होत असते. कामोठे शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आध्यात्मिक विषयांमध्ये व कार्यामध्ये मोठा सहभाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचा पाहायला मिळतो. या संघटनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकमेकांच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होत असते. यातच १ जून हा महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढदिवस असलेला दिवस असल्याने, 20 ज्येष्ठ नागरिकांचा खांदेश्वर स्टेशनच्या मैदानात एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शांताराम चौगुले, काशिनाथ म्हात्रे, भास्कर ढोबळे, दत्तात्रय जाधव, नरेंद्र लाड, धोंडीराम सूर्यवंशी, यशवंत सुडके, ज्योतीराम देशमुख, महिपत कदम, पांडुरंग मोहिते, पोपट बाबर, पांडुरंग पवार, प्रदीप लब्दे, धनाजी सावंत, वसंत फडतरे, रामचंद्र व्होळ, आनंद सावंत, सुरेश साळुंखे, शंकर जाधव, राजेंद्र गलांडे या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना (उबाठा) चे नेते सुनील भाऊ गोवारी, कामोठे शहर शेकाप अध्यक्ष गौरव पोरवाल, कामोठे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत नवले, भाजपाचे कामोठे शहर चिटणीस सुरेश खरात, सामाजिक कार्यकर्ते सुनील करपे सर, महासंघर्ष न्युज चे संपादक गणेश जगताप यांनी जेष्ठ नागरिकांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. तसेच पत्रकार महादेव दौंड, प्रभाकर आडेकर, विजय मोहोड, सुरेश निंबाळकर, चंद्रकांत नगराळे, अनिल मेश्राम, दादा निकाळजे, मोहन चांदगुडे असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी यावेळी उपस्थित पाहुण्यांचे व वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शॉल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वाढदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी केक कापून उत्साहात व आनंदात एकत्रित वाढदिवस साजरा झाला. शेवटी उपस्थित आमचे आभार मानून, संघटित व एकोप्याचा संदेश या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक ही खरी कामोठे शहराची संपत्ती असून, कामोठे व खांदेश्वर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटना उत्कृष्ट व आदर्श अशी संघटना असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!