ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

प्राथमिक शाळांचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते – संतोष नलावडे


(फोटो :- जाधववाडी (ता. पुरंदर ) येथे नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आलेली मिरवणूक)

 पुरंदर प्रतिनिधीदि.18:

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षण आता खाजगी शाळांच्या तुलनेत अतिशय दर्जेदार आणि प्रगत झाले आहे. अनेक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, स्मार्ट टीव्ही, आणि प्रोजेक्टर्सद्वारे आधुनिक शिक्षण दिले जाते.स्थानिक गावांचा आणि पालकांचा सहभाग वाढल्यामुळे तसेच शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक शाळांनी जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते, असे मत जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता संतोष नलावडे यांनी व्यक्त केले.
दिवे केंद्रातील जाधववाडी (ता. पुरंदर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा १५ जून पासून प्रारंभ करण्यात आला. शाळा भेट प्रसंगी श्री. नलावडे बोलत होते.

यावेळी दिवे ग्रामपंचायत सदस्या भारती आढाळगे, निलेश जाधवराव, ग्रामपंचायत अधिकारी काशीपती सुतार, निखिल आढाळगे, ज्ञानेश्वर मात्रे, अविनाश दिवेकर, आशिष दिवेकर, गणेश आढाळगे, रमेश आढाळगे, मारुती शेंडगे, विष्णू लव्हाळे, मुख्याध्यापक सुनील लोणकर, सहशिक्षिका सुरेखा लोणकर, मदतनीस अक्षदा आढाळगे आदीसह जाधववाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.


शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, गोड पदार्थांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जाधववाडी शाळेत गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या इयत्ता पहिलीतील मुलांचे कुंकवाच्या ताटात पाऊल बुडवून कागदावर ठसे उमटवून पहिले पाऊल , मुलांसाठी सेल्फी पॉईंट, मजेदार झोका हे उपक्रम राबविण्यात आले.


प्रगतशील शेतकरी कै. छबनबापू जाधवराव यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उद्योजक ऋषिकेश जाधवराव, श्रीकांत जाधवराव, दिपाली देशमुख -जाधवराव यांनी सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा लोणकर यांनी केले. आभार अक्षदा आढाळगे यांनी मानले.

error: Content is protected !!