
🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 दि.०४: (उमेश शेटये) :
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९) रा. लोलावत का मोहल्ला धर्कदा उदयपूर संगतडा राजस्थान हा दि. ०४ जुलै,२०२६ रोजी आपल्या ताब्यातील गाडी टाटा सिग्मा दहा टायर घेऊन गोवा ते मुंबई महामार्गावर घेऊन जात असताना दि.०४ जुलै २०२६ रोजी ०१:४५ वाजता जिजामाता चौक, ओरोस, ता.जि.सिंधुदुर्ग येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत १,५०,३००००/- (एक कोटी पन्नास लाख तीस हजार रू.) किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईमध्ये १,१५,२०,०००/- किंमतीची गोवा बनावटीची दारू तसेच ३५,००,०००/- ची टाटा सिग्मा दहा टायर गाडी व १०,०००/- किंमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. सदर कारवाई मध्ये आरोपी विरेंद्र गोविंद पटेल याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (इ), ८१, ८३ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (२), ३३६ (२) (३), ३४० (२), ३ (५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री. मोहन दहीकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.कु.नयोमी साटम अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक श्री प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा, पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर, ऋषिकेश टोपले यांनी केलेली आहे. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.
