ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

तालुका महिला उपाध्यक्षा विशाखा देशमुख व सांस्कृतिक अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम


🔳 खालापूर प्रतिनिधी 🔳 दि.२८सप्टेंबर, २०२६:
खालापूर तालुक्यातील नवघर (शेणगाव) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री गणेशोत्सव निमित्त घरगुती गणपती बाप्पाच्या सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका महिला उपाध्यक्षा सौ.विशाखा संदीप देशमुख (जगताप) व तालुका सांस्कृतिक अध्यक्ष श्री. वैभव देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये २८ घरगुती गणेश भक्तांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


” घरगुती गणपती सजावटीच्या माध्यमातून नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळाला, तसेच गणेशोत्सवाची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा अधिक उत्साहात जपली जावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन भाजपा खालापूर तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष विशाखा संदीप देशमुख व तालुका सांस्कृतिक अध्यक्ष वैभव हनुमंत देशमुख यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.” अशी माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोहिदास चौधरी, द्वितीय क्रमांक भावेश देशमुख, तृतीय क्रमांक प्रजात देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा व नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू ठेवण्यात येईल, असे मत यावेळी आयोजकांनी मांडले.
या कार्यक्रमाला भाजपा खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव व तालुका सरचिटणीस विशाल लोते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच गावातील भाजपा नेते आणि कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. राजेंद्र देशमुख, ओंकार देशमुख, संजय देशमुख, प्रमोद देशमुख, नारायण देशमुख, भगवान देशमुख, अनिल देशमुख, निखिल देशमुख, वेदांत देशमुख, शुभम देशमुख व बबल्या देशमुख यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!