ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी महिला जालन्यातून जेरबंद; चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू


🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 (उमेश शेटये) ३०सप्टेंबर,२०२६:

  सावंतवाडी बसस्थानक परिसरात १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत तिला जालना जिल्ह्यातील मंठा येथून अटक करण्यात आली.

सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. बसस्थानक परिसरातून १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

तपासादरम्यान उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी संगीता जाधव (वय ३५, रा. मंठा, जि. जालना) हिने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलसीबी व सावंतवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंठा येथे सापळा रचून २९ सप्टेंबर रोजी तिला ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत आरोपी महिलेने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल शिंदे व महिला पोलीस कॉन्स्टेबल गावकर यांनी सहभाग घेतला.

वेगवान तपास, अचूक तांत्रिक विश्लेषण आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे अवघ्या काही दिवसांत या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

error: Content is protected !!