ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

मुंबई विशेष प्रतिनिधी दि.05 ऑगस्ट, 2026:

भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत भायखळा विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई महानगर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या शहरी परिस्थितीत नियोजनबद्ध अंमलबजावणी करून मतदार पडताळणीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याने निवडणूक व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण झाला आहे.

मुंबईतील झोपडपट्ट्या, उंच निवासी इमारती, पुनर्विकास प्रकल्प, सततचे स्थलांतर, भाडेकरूंची बदलती संख्या, नागरिकांची अनुपस्थिती तसेच दुबार आणि मृत मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी अशा अनेक आव्हानांवर मात करत ही मोहीम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आली.

मतदार नोंदणी अधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन, प्रभावी समन्वय, नियमित आढावा आणि तंत्रज्ञानाधारित अंमलबजावणी यांची प्रभावी सांगड घालण्यात आली. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना क्षेत्रनिहाय उद्दिष्टे देण्यात आली. दैनंदिन प्रगतीचा आढावा, प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय आणि सातत्यपूर्ण क्षेत्रभेटींमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहिली.

मुख्य ठळक मुद्दे :

✅ मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक

✅ एकूण मतदार : २,५८,५६६

✅ पडताळणी पूर्ण : १,९६,२४८ (७५.९० टक्के)

✅ पडताळणी प्रलंबित : ६२,३१८ (२४.१० टक्के)

✅ प्रगणन नमुने संकलित : २,५८,५६६

✅ २६५ मतदारस्तरीय अधिकारी, ५२ पर्यवेक्षक आणि २६ सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचा सहभाग

✅ राजकीय पक्षांच्या ५ समन्वय बैठका

✅ पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेवर विशेष भर

ही कामगिरी संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सामूहिक समर्पणाचे फलित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, बीएलओ , सुपरवायझर्स, एईआरओ , अधिकारी-कर्मचारी, नागरिक, गृहनिर्माण संस्था, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आमचे ध्येय केवळ उद्दिष्ट पूर्ण करणे नव्हते, तर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनविणे हे होते.

कृष्णा जाधव, मतदार नोंदणी अधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर

error: Content is protected !!