ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

निरीक्षक प्रकाश यादव तसेच महामार्ग देवदूत टीम सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

🔳 पुणे प्रतिनिधी 🔳 दि. 06 जुलै 2026:

सोमवार, दि. 06 जुलै, रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांसारखे पाणी वाहू लागल्याने सोबत दगड, धोंडे, माती, चिखल, पाणी यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक वाहनचालक व प्रवासी अडचणीत सापडले होते. वाहने अडकली परिणामी वाहतूक विस्कळीत झाली होती.
तात्काळ उपलब्ध जे.सी.बी. च्या साह्याने रस्त्यामधील माती, दगड चिखल बाजूला करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले.
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महामार्ग आपत्कालीन व्यवस्थापन टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना व वाहनचालकांना आवश्यक ती मदत केली. पाण्याचा प्रवाह, वाहतूक कोंडी आणि सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस याची पर्वा न करता टीमने दिवसभर कर्तव्य बजावत अनेक वाहनांना सुरक्षित मार्ग काढून दिला, तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या आपत्कालीन कार्यात आय.आर.बी. चे प्रकाश यादव, नवनाथ टिळे, विलास म्हस्के व त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेले धैर्य, तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि सार्वजनिक सेवाभाव विशेष उल्लेखनीय असून, त्यांच्या या कार्याचे प्रवासी, नागरिक तसेच विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत निःस्वार्थपणे बजावलेली ही सेवा निश्चितच प्रेरणादायी आणि प्रशंसनीय ठरत आहे.

error: Content is protected !!