ताज्या बातम्या
बाबदेव देवस्थान परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – लोकप्रिय आमदार हेमंत रासने‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

जाधववाडी येथे बाबाराजे जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज जाधवराव मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व फळ वाटप कार्यक्रम

(फोटो: जाधव वाडी (ता. पुरंदर) येथे बाबाराजे जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करताना संगिता काळे, ईश्वर बागमार, युवराज जाधवराव व इतर मान्यवर)

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०५ऑगस्ट,२०२६:
पुरंदर हवेलीचे लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री ना. दादासाहेब जाधवराव यांचे चिरंजीव बाबाराजे जाधवराव हे जाधवराव घराण्याचा लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सामान्यांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवणारे आणि पारदर्शकपणे समाज विकासासाठी सातत्याने राबणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे बाबाराजे जाधवराव होय, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी आदर्श सदस्या सौ. संगिता राजेंद्र काळे यांनी केले.


दिवे केंद्रातील जाधववाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतीय जनता पार्टी पुरंदर हवेली तालुका निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक युवराज जाधवराव मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक शालेय साहित्य व फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सौ. संगीता काळे बोलत होत्या.


यावेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती ईश्वरशेठ बागमार, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी ए. टी. माने, आर्थिक सल्लागार सी.ए. गणेश जाधवराव, प्रगतशील शेती व्यावसायिक सुनील जाधवराव, उद्योजक सागर जाधवराव, विलास साठे, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन आढाळगे, निखिल आढाळगे, मारुती लोणारे, बाळासाहेब आढाळगे, अलका जाधवराव, अपर्णा आढाळगे, काजल आढाळगे, किर्ती आढाळगे, नम्रता शेंडगे, आदीसह जाधववाडीकर ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.


ईश्वरशेठ बागमार म्हणाले, दादासाहेब जाधवराव व बाबाराजे जाधवराव यांच्या कार्यकाळात पुरंदर तालुक्यामध्ये अनेक विकास कामे झाली. स्पष्टवक्ते, दानशूर व धाडसी व्यक्तीमत्त्वाच्या बाबाराजे जाधवराव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.
बाबाराजे जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करताना मनापासून आनंद वाटत असल्याचे उद्योजक, युवा नेते युवराज जाधवराव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन जाधववाडी शाळेचे मुख्याध्यापक सुनील लोणकर, सहशिक्षिका सुरेखा लोणकर, अंगणवाडी सेविका अश्विनी गायकवाड, मदतनीस अक्षदा आढाळगे यांनी केले.

error: Content is protected !!