ताज्या बातम्या
12 June to 18 June1 May to 6 May E paparभाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवडअनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजराजाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत‘गाव तिथे साऊ’ मानवतावादी उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसादपिस्टलचा धाक दाखवून ज्वेलर्स चे दुकान लुटणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंदमोरगाव मध्ये सोमवती अमावस्या उत्साहात साजरीगणेश जगताप यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवडमुंबई व ठाण्यातील डिजिटल मीडिया परिषदेचा भव्य नियुक्ती सोहळा संपन्नकामोठे मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित वाढदिवस सोहळा साजरानिधन वार्ता नामदेव फडतरेअनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातील २६ जूनच्या महामोर्चाला चर्मकार विकास संघाचा जाहीर पाठिंबासिंधुदुर्ग पोलीस व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली चे आयोजन


सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

सोलापूर प्रतिनिधी दि.१८:

13 जून रोजी दुपारी 12:30 चे सुमारास सोलापूर शहरातील शिवकुमार ज्वेलर्स या दुकानांमध्ये स्कुटीवर आलेल्या तीन इसमांनी ज्वेलर्स दुकानांमध्ये घुसून पिस्टल चा धाक दाखवून जबरी चोरी केल्याबाबत सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर जबरी चोरीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्यासाठी सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची चार तपास पथके तयार करण्यात आली. संबंधित घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्यात आली.

शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपींची ओळख पटवत असताना, गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. सोलापूर येथील शिवकुमार ज्वेलर्स मध्ये जबरी चोरी केलेले दोन सोन्याचे नेकलेस विक्री करण्यासाठी एक्टिवा मोटरसायकलवर दोन इसम अक्कलकोट रोड, महालक्ष्मी मंदिराजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. गोपनीय माहितीची खात्री करून, गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सापळा रचून दोन संशयित इसमांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता, त्यांची नावे जिलानी रफिक दामटे (वय ३३) सोलापूर व साहिल उर्फ भाई नबी नंदियाल (वय २४) सोलापूर असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळी जिलानी याची अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेला असलेल्या पट्ट्यामध्ये खोचलेली देशी बनवटीची पिस्टल सोबत तीन जिवंत काडतुसे व त्यांच्या खिशामध्ये एक सोन्याचे नेकलेस व विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. तसेच दुसरा इसम साहिल याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक सोन्याचे नेकलेस व रेडमी कंपनीचा मोबाईल मिळून आला. गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर इसमांकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की, ९ जून २०२६ रोजी वरील दोघे व त्यांचा एक साथीदार रेहान उर्फ जड्ड्या रमजान लडाफ उर्फ शेख (रा.पुणे), असे एकत्रित सोलापूर या ठिकाणी जमले होते. त्यांनी शिवकुमार ज्वेलर्स शॉपची रेकी करून ते लुटण्याची योजना आखली. त्यानुसार साहिल व रेहान यांनी गुन्हा करण्यासाठी सुझुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल 12 जून रोजी कुर्डूवाडी, सोलापूर येथून चोरी केली.

त्यानंतर ते दोघे सदर वाहनावर 13 जून रोजी सोलापूर या ठिकाणी आले. सोलापूर येथे तिघे एकमेकांशी संपर्कात येऊन नमूद ज्वेलर्स शॉप मध्ये जाऊन दुकान मालकास पिस्टलचा धाक दाखवून जबरीने दोन सोन्याचे नेकलेस चोरून नेले होते. त्यावेळी चोरी करताना दुकान मालकाने जोर जोराने आरडाओरडा केल्यामुळे लोक त्या ठिकाणी जमून त्यांना पकडतील या भीतीने गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून पळून गेले होते. संबंधित मोटरसायकल ही कुर्डूवाडी सोलापूर येथून चोरलेली असलेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

अशाप्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे व निलेश सोनवणे पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गंभीर स्वरूपाचा जबरी चोरीचा व एक मोटरसायकल चोरीचा असे दोन गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस (किंमत २ लाख ६० हजार), 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस (किंमत २ लाख ३४ हजार), गुन्हे करताना वापरलेली मोटरसायकल (किंमत ५० हजार), देसी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे (किंमत ५६ हजार), विवो कंपनीचे मोबाईल फोन (किंमत १५ हजार), रेडमी कंपनीचा मोबाईल फोन (किंमत १५ हजार) असा एकूण ६ लाख ३० हजार किंमतीचा मुद्देमाल मिळाला.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. दिलीप पवार सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली,
श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील-सोनवणे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धिरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपुत, सिध्दाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतिश काटे बाळासाहेब काळे, फरदिन शेख यांनी केली आहे.

error: Content is protected !!