ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

मुंबई : प्रतिनिधी

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात २६ जून २०२६ रोजी मुंबईतील विधान भवन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत चर्मकार विकास संघाने महामोर्चाला जाहीर पाठिंबा देत मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

बैठकीला भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी समाजकल्याण मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी २६ जून रोजी होणाऱ्या महामोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले. महामोर्चाचे मायक्रो प्लानिंग करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जातीतील सर्व ५९ समाजघटकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी तसेच न्याय आणि हक्कांसाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

मोर्चाच्या यशासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम राबवत असून युवक, महिला, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील समाजबांधवांचा सहभाग वाढविण्यासाठी व्यापक नियोजन सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांनी संघटनेतर्फे महामोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शवित, चर्मकार समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

error: Content is protected !!