नवरात्रोत्सवानिमित्त बाबदेव देवस्थानला लोकप्रिय आमदार हेमंत रासने यांची भेट

(फोटो – आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील बाबदेव महाराज मंदिरात नवरात्रोत्सव भेट प्रसंगी आ. हेमंत रासने, ईतेश रासने, सौरभ रायकर, संतोष पायगुडे, लहू येवले, साहेबराव वाडकर, तुकाराम मोरे, धनराज पाटणे, सुमित पायगुडे)
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१२ऑक्टोबर,२०२६:
पुरंदर व हवेली तालुक्याला जोडणाऱ्या ऐतिहासिक, निसर्गरम्य व महत्त्वपूर्ण बाबदेव घाटातील बाबदेव देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पुण्यनगरीतील कसबा पेठ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हेमंत रासने यांनी केले.
आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील बाबदेव महाराज मंदिराला नवरात्रोत्सवनिमित्त घटस्थापनादिनी
आमदार हेमंत रासने यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

लोकप्रिय आमदार हेमंत रासने यांच्या समवेत यावेळी दगडुशेठ गणपती मंदिराचे विश्वस्त ईतेश रासणे, विश्वस्त सौरभ रायकर उपस्थित होते.
श्री बाबदेव देवस्थानचे अध्यक्ष संतोष पायगुडे, उपाध्यक्ष लहू येवले, माजी उपाध्यक्ष साहेबराव वाडकर, खजिनदार तुकाराम मोरे, सचिव धनराज पाटणे, सुमित पायगुडे यांनी सर्व मान्यवरांचे श्रीफळ व शाल देऊन सन्मान केला. यावेळी बाबदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पायगुडे यांनी बाबदेव महाराज मंदिर व परिसराचा संपूर्ण इतिहास व माहिती आमदार हेमंत रासने, दगडुशेठ गणपती मंदिराचे विश्वस्त ईतेश रासणे, विश्वस्त सौरभ रायकर यांना दिली.
