ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

🔳 जळगाव प्रतिनिधी 🔳 दि.०८: (मदन लाठी):

  उन्हाळा इतका कडक गेला, हे सर्व आपण अनुभवले आहे. हवामान बदलल्याने पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे.
भूजल पातळीत होणारी घट, पाण्याची वाढती मागणी, शहरी भागात वाढते कॉंक्रिटीकरण लक्षात घेता, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कार्यालयीन इमारती, मोठे मार्केट, गृहनिर्माण संस्था आदींनी  पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, ही पर्यावरण पूर्वक व शाश्वत उपाययोजना आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय?
इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईप द्वारे गोळा करून गाळण (फिल्ट्रेशन) शुद्ध केले जाते. त्यानंतर हे पाणी साठवण टाकेत साठवले जाते किंवा रिचार्ज किंवा सोक पीटद्वारे जमिनीत मुरवले जाते. शैक्षणिक महाविद्यालय शासकीय कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग चे महत्व पाणीबचत व जल सुरक्षा, भूजल पातळी वाढण्यास मदत होते तसेच, महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वरील ताण कमी होण्यास मदत होते.

जर पावसाचे पाणी न साचवले, तर ते सरळ वाहून जाऊन, पूर समस्या निर्माण होतात. रेन हार्वेस्टिंग यामुळे ते कमी होईल, कार्यालयाचे पाणी बिलात बचत होण्यास मदत होते. पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते. यासाठी हा एक प्रमुख घटक आहे, याची नागरिकांमध्ये जनजागृती ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे.
रेनॉर्वेस्टिंग म्हणजे छतावरील पाणी पाईपाद्वारे खाली डायरेक्ट बोरिंग मध्ये न सोडता त्यासाठी २×२ किंवा ३×३ किंवा ४×४ खड्डा करून, त्यात कोळसा, विटा, दगड आधी टाकून छतावरील पाणी यात सोडून जाळी लावून, ते बोरिंग मध्ये सोडावे. या अगोदर फिल्टरेशन लावून ते पाणी आपण बोरिंग द्वारे नेहमीप्रमाणे त्याचा वापर करू शकतो. यासाठी विशेष असा जास्त खर्च नाही, हे सर्वात सोपी पद्धत असून, मेन्टेनन्स नाही. तसेच हाताळण्यास सुलभ आहे. हे केल्याने जल सुरक्षेची खात्री, भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत, शाश्वत शहर घडवू शकतो.
                         उद्याचे जलसंवर्धन.
प्रत्येक पाण्याचा थेंब जपवु या रेन वॉटर हार्वेस्टिंग स्वीकारून जलसुरक्षक शहर घडवु शकतो.
जलतारा ही पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण (ग्राउंड वॉटर रिचार्ज) आणि जलसंवर्धन यासाठी राबवले जाणारी ही प्रभावी संकल्पना आहे.
रेन हार्वेस्टिंग घरोघरी, पाणी राहील दारोदारी…
प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत मुरवा, जलसमृद्ध भारत घडवा.

error: Content is protected !!