ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 मुंबई विशेष प्रतिनिधी 🔳 दि.१०जुलै, २०२६: (दीपक कैतके) :

मुंबई प्रेस क्लबच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक नेतृत्व आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सातत्याने घेतलेली भूमिका, यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे पत्रकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.


यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी तसेच मंत्रालयातील पत्रकारांनी सुरेंद्र गांगण यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

“मुंबई प्रेस क्लब ही केवळ एक संस्था नसून पत्रकारांच्या हक्कांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि व्यावसायिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या संस्थेला सक्षम, अनुभवी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे. सुरेंद्र गांगण यांच्या नेतृत्वाखाली प्रेस क्लब अधिक गतिमान, पारदर्शक आणि पत्रकाराभिमुख होईल,” असा विश्वास उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला.



सुरेंद्र गांगण यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवे समीकरण निर्माण झाले असून, पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व पत्रकारांनी त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देत, आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!