ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२३:(सुरेश गायकवाड):

    सामान्य लोकांच्या “जिव्हाळ्याच्या प्रश्नांना थेट भिडतो तोच पत्रकार !” देशाला भिडणार्‍या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना थेट सामोरे जाणारी मराठी पत्रकारितेची प्रदीर्घ परंपरा तुम्ही कायम ठेवली आहे आणि यापुढेही ठेवाल, अशा शब्दांत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व लेखक पद्मश्री डॉ. नरेंद्र जाधव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारांच्या मानकर्‍यांचे कौतुक केले.


मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात डॉ. नरेंद्र जाधव बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनातील दुसर्‍या मजल्यावरील सभागृहास संघाचे माजी अध्यक्ष कृ. पां. सामक यांचे नाव देण्यात आले, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटनही डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, खजिनदार जगदीश भोवड, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, पदसिद्ध सदस्य नरेंद्र वाबळे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक तसेच यूएनआय वृत्तसंस्थेचे महाराष्ट्रातील माजी ब्युरो चीफ जयंत माईणकर, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, महाराष्ट्र टाइम्सचे माजी मुद्रितशोधक दिगंबर सावंत, दैनिक सामनाचे वृत्तछायाचित्रकार संदीप पागडे, दैनिक नवराष्ट्रचे रामकृष्ण खांदारे आणि पत्रकार राजेंद्र साळसकर यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांचे यंदाचे हे ३६ वे वर्ष आहे. रोख रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पत्रकार संघाने लोणावळा येथे उभारलेल्या विश्रामधामासह पत्रकारांसाठी मोफत अपघाती विमा तसेच पत्रकार भवनातील सभागृहाचे नूतनीकरण असे विविध उपक्रम संघाच्या कार्यकारिणीने राबविले. पत्रकारांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देणारी देशातील ही सर्वोच्च संस्था असल्याचा अभिमान अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.


माईणकर यांनी या पुरस्कारामुळे माझ्या प्रदीर्घ कारकिर्दीची पत्रकार संघाने दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर एबीपी माझाच्या अँकर ज्ञानदा कदम यांनी, ‘याच पत्रकार संघातून मी पत्रकारितेचे धडे शिकले. आज त्याच संस्थेने मला निवेदिकेसाठीचा पहिला पुरस्कार द्यावा, हा मी माझा बहुमान समजते,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.


यावेळी कार्यकारी संपादक प्रसाद मोकाशी यांनी संपादित केलेल्या लोणावळा विश्रामधामवरील विशेषांकाचे डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच या विशेषांकासाठी विशेष परिश्रम घेणार्‍या प्रसाद मोकाशी यांच्यासह स्नेहल मसुरकर, दयानंद जाधव आणि आत्माराम नाटेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सदानंद खोपकर यांच्या नव्या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. पत्रकार संघाच्या युट्यूबद्वारे लाखोंचे उत्पन्न मिळवून देणार्‍या उपक्रमाची यशस्वी हाताळणी करणारे कार्यकारिणी सदस्य राजू खाडे आणि स्वप्नेश माळी यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सदस्यांना यावेळी सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र  शिर्के यांनी, तर सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले.


                  🔳 पुरस्काराचे यंदाचे मानकरी 🔳
शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : रामकृष्ण खांदारे (दैनिक नवराष्ट्र), वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर पुरस्कार’ : दिगंबर सावंत (महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त), सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार’ : राजेंद्र साळसकर,
वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा, वृत्तछायाचित्रकार पुरस्कार’ : संदीप पागडे (दैनिक सामना),
ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ : जयंत माईणकर (राजकीय विश्लेषक आणि यूएनआय वृत्तसंस्था, महाराष्ट्रचे माजी ब्युरो चीफ)
तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट निवेदक किंवा सूत्रसंचालकाला दिला जाणारा  बहुभाषिक पत्रकार साहित्यिक शरद वैद्य  स्मृती पुरस्कार : ज्ञानदा कदम (एबीपी माझा)

error: Content is protected !!