ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

🔳 सोलापूर प्रतिनिधी 🔳 दि.२९:

विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील रात्रीचे वेळी बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणारा
सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद.

दि.25 मे 2026 रोजी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या कल्याण नगर भाग-2, म्हेत्रे टॉवर जवळ, जुळे सोलापूर येथील राहते घराचे सेफ्टी दरवाजाचे व मुख्य दरवाजाचे लॉक तोंडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटामधील सुमारे 217 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1,20,000/- रु. रोख रक्कम चोरी गेले. असा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गु.र.नं. 289/2026, भा.न्या.सं. कलम 331 (3), 331 (4), 305 (a) अन्वये २६ मे रोजी दाखल केला.


वरील नमुद घरफोडी चोरीचा गंभीर गुन्हा घडल्याने नमुद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळी भेट दिली होती. गुन्हयाचे घटनास्थळी सी.सी.टी.व्ही. फुटेज नसल्याने गुन्हा कोणी केला आहे, याबाबत ठोस माहिती मिळत नव्हती. तपास पथकाने घटनास्थळापासुन काही अंतरावर घटनास्थळी येण्या-जाण्याच्या मार्गावर असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजची बारकाईने पाहणी करुन संशयिताचे सी.सी.टी.व्ही. फुटेज काढले. नमुद सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसणारे संशयित इसमांबाबत तपास पथकाने घटनास्थळापासुन ते सोलापूर-पुणे रोडवरील सुमारे 250 कि.मी. पर्यंत असलेल्या 300 सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पडताळणी केली. सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची पडताळणी करुन मिळवलेल्या तसेच तांत्रिक व गोपनिय माहितीचे आधारे आरोपींची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली, की गुन्हयातील आरोपी हा त्याचे हडपसर, पुणे येथील राहते घर परिसरामध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे वरिष्ठांचे परवानगीने स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार असे हडपसर पुणे येथे जावुन आरोपी नामे – सुरजितसिंग राजपालसिंग टाक, (वय 35) यास २० जून रोजी ताब्यात घेतले.


त्यानंतर गुन्ह्याचे अनुषंगाने अटक आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता आरोपी – सुरजितसिंग राजपालसिंग टाक याने सांगितले की, त्याचा मित्र साथीदार नामे – मंजित कुमार, रा.बरवालिया, तहसील – सलोन, जि.रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश याच्यासह मिळुन त्यांनी दि. 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण नगर भाग-2, म्हेत्रे टॉवर जवळ, जुळे सोलापूर येथे घरफोडी केली आहे. सदर आरोपीस विश्वासात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने गुन्हयातील चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी कांही दागिने इसम नामे – लक्ष्मण गणेश रणशिंगे (वय 27) हडपसर, पुणे व संतोष विलास साबळे (वय 29) हडपसर, पुणे यांना विकले आहेत. नमुद इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील 155 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांना सदरचे दागिने हे चोरीचे असल्याचे माहित असतानाही विकत घेतल्यामुळे गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे. तसेच या गुन्हयातील उर्वरीत सोन्याचे दागिने विकत घेणारा सराफ व्यवसायिक नामे – अब्दुल वहिद अब्दुल कादर शेख (वय 45) रा.जि.हुगली, राज्य-पश्चिम बंगाल सध्या रा. रविवार पेठ, पुणे यास दागिने चोरीचे असल्याचे माहित असुन ते विकत घेतले असल्याने गुन्ह्यात आरोपी करुन अटक करण्यात आली आहे.


अशा प्रकारे अटक आरोपींकडुन या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरिता वापरलेले साहित्य असा एकूण 10,63,750/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ.अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री.दिलीप पवार, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद रजपुत, इम्रान जमादार, धिरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंढे, वसिम शेख, काशिनाथ वाघे, आबा सावळे, सैपन सय्यद, विठ्ठल यलमार, राजु मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील, व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे, मारुती घोरपडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!