ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.01जुलै: (सुरेश गायकवाड):

केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितेमुळे कामगारांसह कामगार संघटना उध्वस्त होऊ नये, यासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य, ३ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे. या नवीन श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने कामगार संघटनांशी व्यापक चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा.


कामगारांच्या सेवा अटी, रोजगारातील सुरक्षितता, वेतन, सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक अधिकार यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. तसेच कामगार हिताला बाधा पोहोचेल, असे कोणतेही नियम लागू करू नयेत, अशी मागणी समितीने केली.


राज्य सरकारने सर्व संबंधित पक्षांशी, संघटनांशी चर्चा करून कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारा निर्णय घ्यावा. नाहीतर कामगार उध्वस्त होईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


या कृती समितीमध्ये टी.यू.सी.आय, सीटू, इंटक, एच.एम.एस, टी.यू.सी.सी, आयटक, बी.के.एस, आय.सी.सी.टी.यू, एम.आय.यू.टी.यू.सी, यु.टी.यु.सी. या कामगार संघटना आंदोलनात सामील होणार आहेत. विवेक माँटेरो, दामले, संतोष चाळके, निवृत्ती धुमाळ, गोविंदराव मोहिते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!