ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

या घटनेचा पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२५:
पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीची दखल घेऊन संजय दिना पाटील याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे. संजय दिना पाटील यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिसांसमोर त्यांनी ही धमकी दिली आहे, हे अधिक गंभीर असून त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे.


संजय दिना पाटील आणि अन्य पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यासंदर्भात त्यांची भूमिका, मतं जनतेपर्यंत पोहोचविणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच पत्रकार संजय दिना पाटील यांच्या घरी गेले होते. तेथे गेल्यानंतर काही अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील भडकले आणि त्यांनी पत्रकारांना शिविगाळ सुरू केली.


परत आलात तर मारून टाकील, घरासमोर उभे करतोय xxx मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका, माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा अशी अर्वाच्च, आणि अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली. खासदाराला न शोभणारी ही भाषा संतापजनक आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत असे मत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.


माझ्याकडे बॉम्ब आहे माझ्याकडं निदर्शनं करायला कोणी आलं तर बॉम्ब टाकेल, तसेच मी पाच खून केलेले आहेत अशी भाषा शिवसेनेला उद्देशून संजय दिना पाटील यांनी त्याअगोदर वापरली आहे. एक खासदार माझ्याकडे बॉम्ब आहे अशी उघड धमकी देत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे, संजय दिना पाटलाकडे खरंच बॉम्ब आहे का? असेल तर तो कोठून आला? याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर , विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, डिजिटल मिडिया परिषदेचे अनिल वाघमारे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!