पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपाली झेंडे व पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांच्या वतीने सामाजिक उपक्रम

चांबळी (ता. पुरंदर) येथे अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप प्रसंगी जालिंदर कामठे, रूपाली झेंडे प्राजक्ता दुर्गाडे, अमित झेंडे, अर्चना कटके, अविनाश थोरात, अनिल कांबळे व इतर मान्यवर
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि. २५
पुरंदर तालुक्यातील अंगणवाडी शाळेतील ४८४० विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरांचे वाटप
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपाली अमोल झेंडे व पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित भाऊसाहेब झेंडे यांच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृती व प्रेरणा दिननिमित्ताने चांबळी (ता. पुरंदर) येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे होते. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपाली झेंडे, प्राजक्ता दुर्गाडे, पुरंदर पंचायत समिती सभापती अमित झेंडे, पंचायत समिती सदस्या अर्चना कटके, गटविकास अधिकारी अविनाश थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सरचिटणीस प्रकाश फडतरे, अरविंद जगदाळे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा रेवती कुंजीर, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अजिंक्य कड, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते प्रकाश भालेराव, शेखर पिसे, सरपंच गोपाळ कामठे, मारुती कामठे, भाऊसाहेब कामठे, अमोल ढोणे, राजेंद्र जगदाळे, शांताराम दळवी, सचिन लिंभोरे, सागर जगदाळे, प्रविण बडदे, बाबू घारे, अजित घारे, किरण कटके, नाना शेंडकर, बंडूआप्पा ढवळे, शरद कामठे, रविंद्र पवार, महादेव कामठे, भगिरथ कामठे, नितीन कुंभार, ताईभाभी शेख, संदीप कामठे, धनंजय भांडवलकर, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी संघटक, चांबळीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, पर्यवेक्षिका मनिषा भोसले, अनिता भुजबळ, पुष्पल माळी व सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी संयोजन केले.
