ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख


८ लाख १३ हजार किमतीचे ५० मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 १५जुलै, २०२६ :(महादेव दौंड):

कामोठे पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले जवळपास ५० मोबाईल फोन शोधून काढले आहेत. मोबाईलचा शोध (सी.ई.आय.आर)(सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या केंद्र शासनाच्या पोर्टलचा तसेच तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून सदर मुद्देमाल मिळविण्यात आला. ट्रेस झालेल्या मोबाईलमध्ये वापरण्यात येत असलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन, मोबाईल जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान महाराष्ट्रातील संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती आदी ठिकाणांहून काही मोबाईल कुरिअरद्वारे मागवून घेण्यात आले. तपासात असे आढळून आले की, चोरी झाल्यानंतर मूळ चोरटे हे मोबाईल कोणतेही बिल न देता विविध कारणे सांगून सामान्य नागरिकांना विक्री करत असत. त्यामुळे मूळ चोरट्यांपर्यंत पोहोचणे अनेकदा कठीण ठरते. सन २०२५ व २०२६ मधील उपलब्ध झालेले काही मोबाईल संबंधित फिर्यादींना परत देण्यात येत आहेत. परत करण्यात येणाऱ्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत रु. ८ लाख १३ हजार किंमतीचे आहेत. (सी.ई.आय.आर) हे केंद्र शासनाचे प्रभावी पोर्टल असून, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून (सी.ई.आय.आर) पोर्टलवर नोंदणी करावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

सदर तपास मा. पोलिस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेड़कर, मा. साहयक पोलिस आयुक्त श्री. विक्रम कदम साहेब, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. ज्योती देशमुख मॅडम तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोहर पगार व पो. उपनिरीक्षक प्रतापसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई श्री. राजेंद्र इलग यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. कामोठे शहर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांनी व फिर्यादींनी कौतुक केले.

error: Content is protected !!