ताज्या बातम्या
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा -२०२६,उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणारबाबदेव देवस्थान परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – लोकप्रिय आमदार हेमंत रासने‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारव

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.१२ ऑक्टोबर,२०२६:
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मधील रंगस्वर सभागृहात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने पत्रकारितेत भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांचा विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो. बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप हे २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे असणार आहे.

(अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख )
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांना आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार जान्हवी मुळे देण्यात येणार आहे. हिंदी पत्रकारितेचे भिष्माचार्य बाबुराव पराडकर यांच्या नावाने यावर्षी पासून पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. तो पुरस्कार वरिष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना तसेच, विविध मान्यवरांनी परिषदेकडे ठेवलेल्या रक्कमेतून दत्ताजीराव तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार इटीव्हीचे मराठीचे संपादक सचिन परब यांना, स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे यांना, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार कोल्हापूर सकाळचे सुनील पाटील यांना, ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांना, तर नागोजीराव उर्फ आण्णासाहेब दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांना दिला जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार गडचिरोलीचे न्यूज 18 लोकमतचे पत्रकार महेश तिवारी यांना आणि संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सातारा येथील ग्रामोध्दारचे संपादक बापुसाहेब जाधव यांना दिला जाणार आहे.


१७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष शिवराज काटकर, विश्वस्त शरद पाबळे, विश्वस्त किरण नाईक, मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे, मुंबई अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष दीपक कैतके, डिजिटल मिडिया परिषदेचे अनिल वाघमारे, मुंबईचे अध्यक्ष मनोज भोईर परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, माजी सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर आदिंनी केले आहे.

error: Content is protected !!