ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सासवड मुक्कामी उपक्रम
थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांची माहिती

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१४, जुलै ,२०२६:

पुरंदर तालुक्यातील सासवड मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला होता. सासवड मध्ये लाखो वारकरी भाविक भक्त जमा झाले होते. सगळीकडे आनंदमय वातावरण व जागोजागी राहूत्या उभारल्या गेल्या होत्या.
   यावेळी  पुण्यातील एम.व्ही.आर फाउंडेशन व थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांना थॅलेसेमिया बाबत माहिती देऊन, जनजागृती करण्यात आली.


       या दरम्यान नांदेड, परभणी व अहिल्यानगर या भागातील रुग्णांचे नातेवाईक भेटले असून, त्यांनी, “आम्ही फक्त रक्त चढवत असल्याची व रक्त चढवल्यानंतर लोह कमी करण्याची गोळी देत नसल्याचे सांगितले.”  सालाबाद प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. वारीच्या माध्यमातून असेच जनसेवेचे कार्य पुढेही सुरू ठेवू, असे थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांनी सांगितले.

(फोटो – सासवड (ता. पुरंदर) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविक भक्तांना थॅलेसेमिया बाबत माहिती देताना, थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम)

error: Content is protected !!