ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 पुणे प्रतिनिधी 🔳 दि.१२सप्टेंबर,२०२६:
पुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि दक्षिण पुणे जिल्हा पत्रकार संघ असे दोन स्वतंत्र जिल्हा पत्रकार संघ निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज पुणे येथे केली.


पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील तालुका संघाचे पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक आज पुण्यात घेण्यात आली. बैठकीत एस. एम. देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी मार्गदर्शन केले.


आपल्या भाषणात एस. एम. देशमुख पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पत्रकारांची वाढती संख्या, जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि वाहतूक समस्येमुळे  संघटनेच्या विस्ताराच्या दृष्टीनं मर्यादा येत होत्या. संघटनेच्या प्रशासकीय कामातही अडचणी येत होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करण्यात येत आहेत. उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली आणि मावळ या सहा तालुक्यांचा समावेश असेल, तर दक्षिण पुणे जिल्हा पत्रकार संघात मुळशी, पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, भोर, वेल्हे या सात जिल्ह्यांचा समावेश असेल. दोन्ही जिल्हा संघांचे दोन स्वतंत्र अध्यक्ष असतील, दोन स्वतंत्र कार्यकारिणी असतील.


पुणे महानगर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघ हे दोन्ही महानगर पत्रकार संघ थेट अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी जोडले जातील. याशिवाय दक्षिण पुणे, उत्तर पुणे, पुणे महानगर आणि पिंपरी – चिंचवड या चार वेगवेगळ्या कमिटयांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी पुणे शहरातील एका पत्रकाराची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. दोन्ही जिल्हा समित्यांच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री देशमुख यांनी सांगितले.


तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि पुणे शहरातील विविध पत्रकार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पुढील महिन्यात पुणे येथे पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. त्याबाबतची माहिती शरद पाबळे यांनी बैठकीत दिली, तर सुनील लोणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष गणेश मोकाशी तसेच जिल्हा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!