ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

खारघर सेक्टर ११ मध्ये बोरवेलचे लोकार्पण

नवी मुंबई: सुरेश गायकवाड

नवी मुंबईतील पनवेल शहर, वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे खारघर सेक्टर ११ येथील श्री देवळेश्वर खेळाच्या मैदानातील वृक्षांचे संवर्धन करणे मोठे आव्हानात्मक बनले होते. स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग स्वतः पाणी आणून झाडांना जीवनदान देत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाउंडेशनने पुढाकार घेत पनवेल महानगरपालिकेकडे मैदानात बोरवेल मंजूर करण्याची मागणी केली होती.
फाउंडेशनचे संस्थापक विकास तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे अखेर पनवेल महानगरपालिकेच्या खर्चातून मैदानात बोरवेलचे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे मैदानातील शेकडो वृक्षांना नियमित पाणीपुरवठा होणार असून पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच “हरित खारघर” चे स्वप्न साकार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले गेले.
फाउंडेशनचे सदस्य जितेंद्र बनसोडे यांनी सांगितले की, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निसर्गप्रेमी विचारांपासून प्रेरणा घेऊन भविष्यातही वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक प्रदीप कांबळे, राजाराम माळी, सुनील म्हसकर, अशोक साळवी आणि नानासाहेब जाधव यांनी वृक्षसंवर्धनासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले.
कार्यक्रमास सकल मराठा समाज खारघरचे अध्यक्ष कालिदास देशमुख तसेच खारघर नगर रहिवासी संघ गणपती मंडळ, सेक्टर ११ चे अध्यक्ष सुनील भोईटे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सेक्टर ११ मधील ज्येष्ठ कार्यकर्ते अमित राणे आणि बापूसाहेब ढेंबरे यांनी फाउंडेशनने भविष्यातही अशाच समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी सर्वांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित अधिकारी तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे सर्व नागरिक, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
वृक्षसंवर्धनासाठी समाज आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे प्रेरणादायी उदाहरण असून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!