ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०८ ऑगस्ट,२०२६:
पुरंदर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या विद्यालयात श्री मार्तंड देवस्थान श्री क्षेत्र जेजुरी ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी ट्रस्टचे विश्वस्त मंगेश घोणे व देवस्थानचे विश्वस्त पोपटराव खोमणे व किर्लोस्कर फेरस कामगार संघटना जेजुरी उपाध्यक्ष विकास जगताप यांच्या संयुक्त प्रयत्नाने विद्यालयातील २६८ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान किर्लोस्कर फेरस कामगार संघटनेचे अध्यक्ष व मार्तंड देवस्थान जेजुरी चे विश्वस्थ पोपटराव खोमणे यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत ढमाळ सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगेश घोणे साहेब विश्वस्त मार्तंड देवस्थान जेजुरी यांनी मुलांना बहुमोल मार्गदर्शन करून भावी आयुष्यामध्ये अभ्यासातून आपल्या मधील कौशल्यांचा विकास करावा, या संबंधित मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मानसिंग तात्या जगताप, शाळा व्यवस्थापन सदस्य विजय साळुंके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतीश जगताप, पो. पाटील श्रीतेज जगताप, ह.भ.प. दिलीप कदम उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वड, चिंच, पिंपळ इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .रूपाली शिंदे मॅडम यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक प्रशांत माकर सर यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार राहुल कसबे सर यांनी मानले .

error: Content is protected !!