ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख


🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 दि.०४: (उमेश शेटये) :

  पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९) रा. लोलावत का मोहल्ला धर्कदा उदयपूर संगतडा राजस्थान हा दि. ०४ जुलै,२०२६ रोजी आपल्या ताब्यातील गाडी टाटा सिग्मा दहा टायर घेऊन गोवा ते मुंबई महामार्गावर घेऊन जात असताना दि.०४ जुलै २०२६ रोजी ०१:४५ वाजता जिजामाता चौक, ओरोस, ता.जि.सिंधुदुर्ग येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत १,५०,३००००/- (एक कोटी पन्नास लाख तीस हजार रू.) किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईमध्ये १,१५,२०,०००/- किंमतीची गोवा बनावटीची दारू तसेच ३५,००,०००/- ची टाटा सिग्मा दहा टायर गाडी व १०,०००/- किंमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. सदर कारवाई मध्ये आरोपी विरेंद्र गोविंद पटेल याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (इ), ८१, ८३ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (२), ३३६ (२) (३), ३४० (२), ३ (५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
   सदरची कारवाई श्री. मोहन दहीकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.कु.नयोमी साटम अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक श्री प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा, पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर, ऋषिकेश टोपले यांनी केलेली आहे. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!